लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.मनीष मेहता असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. बँकेने २९ जून २०१९ रोजी वर्तमानपत्रामध्ये नोटीस जारी करून मेहता यांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले. त्यावर मेहता यांचा आक्षेप आहे. ही कारवाई करताना नोटीस देण्यात आली नाही. तसेच, सुनावणीची संधी देऊन म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही असे मेहता यांचे म्हणणे आहे. वादग्रस्त कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अतुल पांडे यांनी कामकाज पाहिले.