लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकांवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.मतदार अॅड. सतीश उके यांनी फडणवीस तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय घोडमारे यांनी मेघे यांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर तर, मेघे हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फडणवीस यांचे नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्र चुकीच्या पद्धतीने स्वीकारले. प्रतिज्ञापत्र वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी विलंब करण्यात आला. दरम्यान, नामनिर्देशनपत्र व प्रतिज्ञापत्रातील अनेक त्रुटी अवैधपणे दूर करण्यात आल्या. यासह अन्य विविध गैरप्रकार फडणवीस यांना लाभ पोहचविण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यात आले, असा उके यांचा आरोप आहे. घोडमारे यांनी बोगस मतदारांचा मुद्दा मांडला. मेघे यांनी वर्धा जिल्ह्यातील सुमारे ५० हजार मतदारांची नावे हिंगणा मतदारसंघात नोंदवली. त्यापैकी अनेक मतदार मेघे यांच्या संस्थांमध्ये कर्मचारी आहेत. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा मिळाला, असे घोडमारे यांचे म्हणणे आहे. उके यांनी स्वत: तर, घोडमारेतर्फे अॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
हायकोर्ट : फडणवीस, मेघेंना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 8:21 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वेगवेगळ्या निवडणूक याचिकांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार समीर मेघे यांना नोटीस बजावून १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्देदोघांच्याही निवडणुकीला आव्हान