हायकोर्ट : नवनीत राणा यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:52 PM2019-07-29T23:52:51+5:302019-07-29T23:54:04+5:30
लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून २६ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या अमरावती मतदार संघातून विजय मिळविलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी राणा यांना नोटीस बजावून २६ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
राणा यांच्याविरुद्ध शिवसेनेचे पराभूत उमेदवार आनंद अडसुळ व कार्यकर्ते सुनील भालेराव यांनी वेगवेगळ्या निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. राणा या पंजाब येथील ‘लुभाणा’ जातीच्या आहेत. त्यामुळे त्या या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी अपात्र होत्या. परंतु, त्यांनी गैरप्रकार करून ही निवडणूक लढवली. परिणामी, अनुसूचित जातीवर अन्याय झाला. ही बाब लक्षात घेता त्यांची निवडणूक रद्द करून या मतदारसंघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. राघव कवीमण्डन, अॅड. सचिन थोरात व प्रदीप पाटील यांनी कामकाज पाहिले.