लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४ सप्टेंबर रोजी मनपाने मंदिर परिसरातील अवैध दुकाने जमीनदोस्त केली. त्यानंतर मंदिराचे अवैध बांधकाम वाचले होते. दरम्यान, पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे पुढील कारवाई होऊ शकली नाही. मनपाचे वकील अॅड. जेमिनी कासट यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला. तसेच, मंदिर प्रशासनाने कारवाईत अडथळा निर्माण करू नये, असे सांगितले.अवैध दुकाने पाडण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने याचिका दाखल केली होती. उद्देश पूर्ण झाल्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात आली. अवैध दुकानदारांनी संरक्षण मिळण्यासाठी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयालाही विनंती केली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यांना दुकानांवर कायदेशीर अधिकार सिद्ध करता आला नाही. मंडळातर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.मोकळी जागा पार्किंगसाठी वापरणारदुकाने पाडल्यामुळे मोकळी झालेली जागा पार्किंगकरिता वापरण्यात येईल अशी ग्वाही श्री साईबाबा सेवा मंडळाने उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने ही ग्वाही आदेशात नोंदवून मंडळाला यानुसार कृती करण्याचे निर्देश दिले. रोज शेकडो भाविक साई मंदिरात येतात. मंदिर परिसरात पार्किंगकरिता जागा उपलब्ध नसल्यामुळे भाविक रोडवर वाहने उभी ठेवत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. वस्तीमधील नागरिक यामुळे त्रस्त झाले होते. अवैध दुकाने पाडल्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे. मंदिराच्या मंजूर आराखड्यात ही जागा पार्किंगकरिताच आरक्षित आहे.
हायकोर्टाचा आदेश : साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:32 PM
वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला.
ठळक मुद्देमनपाला दिला तीन दिवसाचा वेळ