लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे.अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा धोत्रे यांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. परिणामी, अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूक रद्द करून या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. निवडणुकीत धोत्रे हे सर्वाधिक ५ लाख ५४ हजार ४४४ मते मिळवून विजयी झाले आहेत. विदर्भातील भावना गवळी वगळता अन्य नऊही खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, हे येथे उल्लेखनीय. न्यायालयात सुलताने यांच्यातर्फे अॅड. निहालसिंग राठोड कामकाज पाहतील.
हायकोर्ट : संजय धोत्रे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:39 PM
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देनव्याने निवडणूक घेण्याची मागणी