हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 08:02 PM2020-02-04T20:02:41+5:302020-02-04T20:04:42+5:30

केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला.

High Court: Petitioner against Sanjay Dhotre hits | हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका

हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका

Next
ठळक मुद्दे२५ हजार रुपये दावा खर्च बसवला

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्रीसंजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अदा करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवींद्र घुगे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. धोत्रे भाजपाचे खासदार असून, ते अकोला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, असे अडबोल यांचे म्हणणे होते. परंतु, ते गुणवत्तेवर न्यायालयाला प्रभावित करू शकले नाही. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे २४ जानेवारी २०१४ रोजी प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वे व १३ मार्च २०१४ रोजी जारी अधिसूचनेनुसार लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत बँकमध्ये खाते सुरू करणे आवश्यक होते. त्या खात्यातील रक्कमच निवडणुकीवर खर्च करता येणार होती. परंतु, धोत्रे यांनी याचे पालन केले नाही. त्यांनी स्वत:च्या बँक खात्यात सर्व स्रोतांचे मिळून एकूण ३४ लाख २५ हजार रुपये जमा दाखवले होते. निवडणुकीनंतर त्यांनी निवडणुकीवर खर्च केलेल्या ३२ लाख ९६ हजार ५९५ रुपयांचा तपशील सादर केला. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर खर्चात दुरुस्ती करून त्यात ६ लाख ४७ हजार ८९५ रुपयांचा समावेश केला गेला. परिणामी एकू ण खर्च ३९ लाख ४४ हजार ४९० रुपये झाला. हा खर्च बँक खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त असल्यामुळे धोत्रे अपात्र ठरतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. धोत्रे यांच्यातर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: Petitioner against Sanjay Dhotre hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.