शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

हायकोर्ट :  संजय धोत्रेंविरुद्धच्या याचिकाकर्त्याला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:04 IST

केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला.

ठळक मुद्दे२५ हजार रुपये दावा खर्च बसवला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्रीसंजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अदा करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवींद्र घुगे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. धोत्रे भाजपाचे खासदार असून, ते अकोला मतदारसंघातून विजयी झाले आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, असे अडबोल यांचे म्हणणे होते. परंतु, ते गुणवत्तेवर न्यायालयाला प्रभावित करू शकले नाही. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे २४ जानेवारी २०१४ रोजी प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वे व १३ मार्च २०१४ रोजी जारी अधिसूचनेनुसार लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत बँकमध्ये खाते सुरू करणे आवश्यक होते. त्या खात्यातील रक्कमच निवडणुकीवर खर्च करता येणार होती. परंतु, धोत्रे यांनी याचे पालन केले नाही. त्यांनी स्वत:च्या बँक खात्यात सर्व स्रोतांचे मिळून एकूण ३४ लाख २५ हजार रुपये जमा दाखवले होते. निवडणुकीनंतर त्यांनी निवडणुकीवर खर्च केलेल्या ३२ लाख ९६ हजार ५९५ रुपयांचा तपशील सादर केला. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर खर्चात दुरुस्ती करून त्यात ६ लाख ४७ हजार ८९५ रुपयांचा समावेश केला गेला. परिणामी एकू ण खर्च ३९ लाख ४४ हजार ४९० रुपये झाला. हा खर्च बँक खात्यात जमा रकमेपेक्षा जास्त असल्यामुळे धोत्रे अपात्र ठरतात, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. धोत्रे यांच्यातर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSanjay Dhotreसंजय धोत्रेministerमंत्री