हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:55 PM2020-06-11T21:55:31+5:302020-06-11T21:59:08+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

High Court prohibits breaking of heat ventilation in hill temple | हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई

हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई

googlenewsNext
ठळक मुद्देमंदिर ट्रस्ट अध्यक्षांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
यासंदर्भात ट्रस्टचे सचिव संजय जोगळेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मंदिरात सुमारे ४० लाख रुपये खर्च करून हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक बांधण्यात आले आहे. परंतु, ट्रस्ट अध्यक्षांनी कार्यकारी समितीच्या मान्यतेशिवाय ते तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यावर अंमलबजावणीही सुरू केली. त्याविरुद्ध उप-धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला असता त्यांनी लॉकडाऊनमुळे त्याची दखल घेतली नाही. भाविकांच्या देणगीतून हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डकचे काम करण्यात आले आहे. ते तोडण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे वादग्रस्त कारवाई अवैध ठरविण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता याचिकाकर्त्याला दिलासा दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court prohibits breaking of heat ventilation in hill temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.