हायकोर्ट : अत्याचार करणाऱ्याची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:30 PM2019-03-05T21:30:37+5:302019-03-05T21:31:29+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
प्रवीण सूर्यभान गुबे (३०) असे आरोपीचे नाव असून तो गिरोला, ता. हिंगणा येथील रहिवासी आहे. ही घटना १ फेब्रुवारी २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ६ वर्षे वयाची होती. मुलगी आरोपीच्या ओळखीची होती. त्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. १२ सप्टेंबर २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध पुरावे लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. आरोपीने काही त्रुटींवर बोट ठेवून संशयाचा लाभ मिळण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने त्याचे मुद्दे अमान्य केले.