लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा दिला.दिशानी पारधी, निश्चल झाडे व नलीन नरांजे अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचे शिक्षण महाराष्ट्राबाहेरून घेतले असल्यामुळे त्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज विचारात घेण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुनावणीदरम्यान, प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियमांत झालेल्या दुरुस्तीकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार याचिकाकर्ते वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यास पात्र ठरतात. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या प्रवेश अर्जांवर पुढील प्रक्रिया करण्याचा आदेश सीईटी सक्षम अधिकाऱ्यांना दिला तसेच नोटीस बजावून यावर उत्तर मागितले. प्रकरणावर १५ जून रोजी पुढील सुनावणी होईल. प्रवेश प्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. नंदेश देशपांडे, अॅड. शिल्पा बरबटे व अॅड. एस. डी. देवरस यांनी बाजू मांडली.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:10 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा दिला.
ठळक मुद्देदहावीचे शिक्षण महाराष्ट्राबाहेरून घेतले : त्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज विचारात घेण्यात आले नव्हते