शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मतदार यादी प्रकरणी नागपूर विद्यापीठाला हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 8:59 PM

सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला आहे.

ठळक मुद्देप्राध्यापकांची याचिका मंजूर

आॅनलाईन लोकमतनागपूर : सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला आहे.योगेश मुनेश्वर, निरंजन ब्राह्मणे, अरविंद पाटील, डॉ. रवींद्र सहारे, सोनाली खांडेकर व कल्पना बंडीवार अशी प्राध्यापकांची नावे असून ते वर्धा येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत आहेत. संबंधित मतदार यादीसाठी प्राध्यापकांची नावे १३ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन किंवा कागदोपत्री सादर करणे आवश्यक होते. अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाने आॅनलाईन यादी सादर केली नाही. त्यामुळे या प्राध्यापकांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला नाही. परिणामी प्राध्यापकांनी सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप सादर केले होते. ५ आॅक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे आक्षेप खारीज केले. त्या निर्णयाविरुद्ध प्राध्यापकांनी कुलगुरूंकडे अपील दाखल केले. कुलगुरुंनी १२ आॅक्टोबर व १६ आॅक्टोबर २०१७ रोजी सर्वांचे अपील फेटाळले. परिणामी प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता विद्यापीठ व महाविद्यालयाच्या चुकीमुळे पात्र प्राध्यापकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असे स्पष्ट करून विद्यापीठाचे सर्व वादग्रस्त आदेश रद्द केले व संबंधित प्राध्यापकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय दिला.

 

टॅग्स :Courtन्यायालय