हायकोर्ट : आरोपी पितापुत्राच्या शिक्षेवर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:25 PM2020-07-31T21:25:27+5:302020-07-31T21:26:53+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दोन सख्ख्या भावांच्या खून प्रकरणातील आरोपी पितापुत्र झनक तोमसकर व अंकुश तोमसकर यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर स्थगिती देऊन त्यांना जामीन मंजूर केला. आरोपी समतानगर येथील रहिवासी आहेत.
इमरत व पुरणलाल राणा अशी आरोपींची नावे असून ते सख्खे भाऊ होते. १२ जून २०१६ रोजी नालीची सफाई करण्यावरून आरोपींचा इमरतसोबत वाद झाला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर या आरोपींनी इतर साथिदारांसोबत मिळून इमरत, त्याची पत्नी सुनीता व पुरणलालवर चाकू, दगड व काठ्यांनी हल्ला केला अशी पोलीस तक्रार आहे. जरीपटका पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून तपासानंतर सर्वांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने सदर पितापुत्रासह एकूण चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यात सदर आरोपी पितापुत्राने अपिलावर निर्णय होईपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याची विनंती केली होती. आरोपींतर्फे अॅड. आर. के. तिवारी यांनी कामकाज पाहिले.