लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने धार्मिक वादातून करण्यात आलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील एक आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली तर, दोन आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ही घटना अनसिंग, ता. वाशीम येथील आहे.सय्यद अझहर सय्यद कलंदर (३०) असे शिक्षा कायम ठेवण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून निर्दोष सुटलेल्या आरोपींमध्ये शेख राशीद शेख गनी (२७) व मो. लुकमन मो. शेख इरफान (२५) यांचा समावेश आहे. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने कलंदरचे अपील फेटाळले तर, अन्य दोन आरोपींचे अपील मंजूर केले.चिंतामण डांगे असे जखमीचे नाव आहे. ही घटना ११ मे २०१६ रोजी घडली होती. त्या दिवशी गावातून मस्तान शाह बाबा यांची संदल काढण्यात आली होती. संदल गांधी चौकात पोहोचल्यानंतर धार्मिक मुद्यावरून वाद झाला. दरम्यान, डांगे व इतर काहीजण वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी डांगे यांच्यावर चाकूने हल्ला केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
हायकोर्ट : दहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:34 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धार्मिक वादातून करण्यात आलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील एक आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली तर, दोन आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ही घटना अनसिंग, ता. वाशीम येथील आहे.
ठळक मुद्देधार्मिक वादातून खुनी हल्ला