लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पाहता पाहता या रुग्णसंख्येने चार हजाराचा आकडा शुक्रवारी पार केला असून आज ४०९५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आहे.या वाढत्या आकड्यांसोबतच मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३५ जणांचा आज मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यातील पहिल्या १० जिल्ह्यामध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या आणीबाणीच्या काळातून प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतली नसल्याने, आता पुन्हा रुग्ण वाढत असतान शासकीय व खासगी रुग्णालयातील अपुऱ्या खाटा व आवश्यक सोयी कमी पडताना दिसून येत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाची गंभीर लक्षणे दिसूनही काही रुग्ण रुग्णालयात येण्यास उशीर करीत आहेत.