लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात रोजच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. सोमवारी ९९७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २३१०१ वर पोहचली असून मृतांची संख्या ५६६ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ६०४, यवतमाळ जिल्ह्यात १५९, बुलढाणा जिल्ह्यात ६४, अकोल जिल्ह्यात ४७ तर गोंदिया जिल्ह्यात ४३ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात रुग्ण व मृतांच्या संख्येची भयावह आकडेवारी दिसून येत आहे. आज ६०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर १९ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ९३८४ झाली असून मृतांची संख्या ३३४ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा मृत्यूही झाला. रुग्णांची एकूण संख्या १६५७ तर मृतांची संख्या ४९वर पोहचली आहे. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. ६४ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या १९७१ झाली आहे. अकोला जिल्ह्यात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ३०६७झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात ४३ रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या ६४३ वर गेली आहे. एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या चार झाली आहे. वाशिम जिल्ह्यात २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ९५६झाली आहे. अमरावती जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत आज किंचीत घट आली. २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३०९५ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या ८७२ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात आठ, वर्धा जिल्ह्यात पाच तर गडचिरोली जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले.