शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; मॉडेलिंगच्या पडद्याआड 'ती' करायची देहविक्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 8:00 AM

Nagpur News मॉडेलिंगच्या शूटसाठी जाते, असे सांगून ती घराबाहेर पडायची आणि वेगवेगळ्या शहरात थांबून चक्क वेश्याव्यवसाय करायची. पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या मॉडेलिंगचा मुखवटा गळून पडला.

ठळक मुद्देशूटिंगचे नाव, घरच्यांना थाप पकडली गेल्यानंतर पुढे आली स्टोरी

नरेश डोंगरे 

नागपूर : मॉडेलिंगच्या शूटसाठी जाते, असे सांगून ती घराबाहेर पडायची आणि वेगवेगळ्या शहरात थांबून चक्क वेश्याव्यवसाय करायची. पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या मॉडेलिंगचा मुखवटा गळून पडला. दरम्यान, नवऱ्याला हे माहीत पडल्यास त्याच्यासमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा प्रश्न तिला सध्या सतावत आहे.

रश्मी (नाव बदललेले, वय २७) ही नोएडा येथील रहिवासी आहे. तीन मुलांची आई असलेल्या रश्मीने स्वत:ची उत्तमपणे देखभाल केलेली आहे. घरची आर्थिक स्थिती कोरोना काळात कोलमडल्याने ती दिल्लीतील दीपेश नामक दलालाच्या संपर्कात आली. दीपेशचे ऑनलाइन वेश्याव्यवसायाचे नेटवर्क देशभरातील अनेक शहरात पसरले आहे. विशिष्ट कालावधीसाठी तो त्याच्या नेटवर्कमधील वेश्यांना वेगवेगळ्या शहरात पाठवतो. मैत्रीणीच्या माध्यमातून दीपेशच्या नेटवर्कमध्ये सहभागी झालेली रश्मी काही महिन्यांपासून वेश्याव्यवसाय करते. नवऱ्याला मात्र ती मॉडेलिंग करते, असे सांगते. मॉडेलिंगसाठी शूटवर बाहेरगावी जात आहे, असे सांगून ती घराबाहेर पडते. गेल्या आठवड्यात रश्मी अशाचप्रकारे शूटवर जात आहे, असे सांगून घराबाहेर आली आणि नागपुरात येऊन वेश्याव्यवसाय करू लागली. मात्र, नागपुरात तिचे बिंग फुटले. मिळालेल्या टीपच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी गुरुवारी रात्री रामदासपेठेतील हॉटेल ऑक्टेव्ह पार्कलॅण्डमध्ये आणि त्यानंतर वर्धा मार्गावरील हॉटेल फ्लोरा इनमध्ये छापा घातला. या ठिकाणावरून दिल्ली, नोएडा येथील तीन देखण्या वारांगनांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या जोसेफ कुट्टीलाही पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चाैकशीत नोएडातील रश्मीकडून उपरोक्त माहिती उघड झाली. वेश्याव्यवसाय करताना नवऱ्याला मात्र मॉडेलिंग करण्याची थाप मारून ती घराबाहेर पडत होती. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईचा बोभाटा झाल्यास नवऱ्याचा आणि घरच्या अन्य सदस्यांचा सामना कोणत्या तोंडाने करायचा, असा प्रश्न रश्मीला सतावत आहे.

त्या शरीर विकतात, तो कमाई खातो!

प्रत्येकीच्या खाण्या- पिण्याची आणि राहण्याची व्यवस्था दिल्लीतील कथित दीपेश त्याच्या एजंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात करतो. कुण्या वारांगनेला तो देहविक्रयाच्या बदल्यात एका वेळीचे एक हजार तर, कुणीला दीड हजार देतो. स्वत: मात्र ग्राहकाकडून पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत वसूल करतो.

दीपेश कोण, खरा की खोटा?

या कारवाईनंतर पकडल्या गेलेल्या एजंट तसेच वारांगनांकडून पोलिसांना वेगवेगळी माहिती मिळाली आहे. देशभर ऑनलाइन प्रॉस्टीट्यूशनचे नेटवर्क चालविणाऱ्या दीपेशसह अनेकांची नावेही पुढे आली आहेत. मात्र, ही माहिती खरी की खोटी, त्याबाबत शंका आहे. वेश्याव्यवसायाच्या नेटवर्कमध्ये गुंतलेले सर्वच जण बनावट नावाने फिरतात. त्यामुळे दीपेशचे नाव आणि पत्ता किती खरा आणि किती खोटा, ते पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

---

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसाय