सीए विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परिषद : दोन दिवसीय आयोजननागपूर : निरंतर शिक्षण ही सक्षम व्यावसायिकासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. चार्टर्ड अकाऊटंटचे शिक्षण हा त्यातला एक भाग आहे. शिक्षणाने विद्यार्थ्यांना उत्तुंग भरारी मारणे शक्य होते, असे मत बोर्ड आॅफ स्टडीजचे चेअरमन देवराज रेड्डी यांनी येथे व्यक्त केले. अखिल भारतीय चार्टर्ड अकाऊटंट आॅफ इंडियाचा पश्चिम विभाग आणि नागपूर शाखेच्यावतीने सीएंच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गुरुवारी सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह आणि पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष जुल्फेश शाह उपस्थित होते. देशभरातील ८०० पेक्षा जास्त सीएंचे विद्यार्थी उपस्थित होते. रेड्डी यांनी सांगितले की, आयसीएआय विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करते.जयदीप शाह आणि जुल्फेश शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उमंग अग्रवाल यांनी परिषद आयोजनाची माहिती दिली. बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, डब्ल्यूआयआरसी अॅण्ड सीए एसजीचे चेअरमन अनिल भंडारी, डब्ल्यूआयसीएएसएचे चेअरमन यांनी मत मांडले. उद्घाटनप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे माजी अध्यक्ष स्वप्नील अग्रवाल, डब्ल्यूआयसीएएसएचे सचिव शिव शर्मा यांच्यासह कीर्ती अग्रवाल, स्वप्नील घाटे, संदीप जोतवानी, सुरेन अग्रवाल, राजीव दमानी, सुधीर सुराणा, मिलिंद पटेल, अभिजित केळकर, विजय अग्रवाल, विनोद हसानी, विजय वासवानी, संजय अग्रवाल, दीपक जेतवानी, किशोर पुनियानी , रितेश भोजवानी, पल्केश खंडेलवाल, गोपाल पारतानी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षणाने उत्तुंग भरारी शक्य
By admin | Published: July 25, 2014 12:48 AM