शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

हिऱ्याच्या कलात्मक सौंदर्याने झळाळलेले प्रदर्शन

By admin | Published: November 01, 2015 3:07 AM

हिऱ्याचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतिक आहे.

इंट्रिया प्रदर्शनाचे उद्घाटन : पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : हिऱ्याचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतिक आहे. आधीच मोहक असलेल्या हिऱ्याला पैलू पाडून हिऱ्याचे कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. हिऱ्याला पैलू पाडणे हे तसे कठीण काम आहे. लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असे हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन शनिवारी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारे दागिने ही ‘इंट्रिया’ची खास ओळख. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी व हिऱ्यांचे व्यापारी हर्निश सेठ यांच्या कल्पना-कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा कोठारी, इंट्रियाचे भागीदार आणि हिऱ्यांचे व्यापारी हर्निश सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. या समारंभाला श्रीमती तारादेवी चोरडिया, गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्त दीपाली मासिरकर, पायल बावनकुळे, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, नीना जैन, रितु जैन, अनुजा छाजेड, डॉ. संजय दर्डा, अ‍ॅड. रमेश दर्डा, किरण दर्डा, अ‍ॅड. तुषार दर्डा, निकेता दर्डा, डॉ. अनिता दर्डा, विंग कमांडर (निवृत्त) रमेश बोरा, डॉ. रवी व शैला गांधी, सेजल शाह, रिचा बोरा, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा, प्रसिद्ध उद्योजक दीपक देवसिंघानी, इंट्रीयाचे रुपेश दाणी, महावीर जैन, सुनीता वाधवान, दीपा झाकीया, मीना जयस्वाल, अमायरा जयस्वाल, लक्ष्मीनारायण शर्मा, चंचल शर्मा, शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा, रणजीतसिंग बघेल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे सृजनात्मक कलात्मकतेचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील डिझाईन्स व अनोखे रचनाकौशल्य मनाला भावल्याखेरीज राहत नाही. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रत्येक दागिन्यांच्या डिझाईन्सवर आणि त्याच्या कलाकुसरीवर हिऱ्यांच्या दागिन्यांवर प्रेम करणारे रसिक लुब्ध झाले. विशेष म्हणजे या प्रदर्शनात दिवाळी आणि सणासुदीच्या मुहूर्तावर उत्कृष्ट कलात्मकतेसह संस्कृती आणि परंपरांचा अनोखा मेळ साधणाऱ्या डिझाईन्स प्रदर्शित करण्यात आल्यामुळे रसिकांची खास पसंती लाभली. (प्रतिनिधी)इंट्रियाचा प्रत्येक दागिना घालण्यासाठी हलका व सोयीचाडिझायनर पूर्वा कोठारी यांनी सांगितले, दागिन्यांमुळे एकूण व्यक्तिमत्त्वाला एक निराळाच लुक येतो. इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि ट्रेंडी असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनात बहुसंख्य दागिने रोस गोल्ड, पिंक गोल्डने तयार केले आहेत. यात इअररिंग्ज, रिंग्ज, कंठहार, कफलिंग्ज आणि ब्रायडल सेट्स यांचा समावेश आहे. या सोबतच बर्मीस रुबीज् (माणिक) आणि इमरलँडस् (पन्ना) जोडण्यात आल्याने दागिन्यांचे सौंदर्य अधिक खुलले आहे. इंट्रिया म्हणजे ‘इंडियन ट्रीजर’. मागील २० वर्षांपासून या ज्वेलरी डिझायनिंगचे काम करीत आहे. इंट्रिया हा ब्रॅण्ड मागील नऊ वर्षांपासून कायम आहे. पूर्वा कोठारी म्हणाल्या, यंदा या प्रदर्शनात प्रामुख्याने लाईट वेट दागिन्यांकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. बरेचदा हिऱ्यांचे दागिने हेवी वेट असतात त्यामुळे फार वेळ दागिने परिधान करणे गैरसोयीचे होत असल्याचे लक्षात आले. जास्तीतजास्त वेळ कम्फर्टेबली हिऱ्यांचे कलात्मक दागिने घालता यावे म्हणून यंदा खास ‘लाईट वेट’ दागिन्यांची श्रृंखला आम्ही सादर केली आहे. दागिन्यांच्या फिनिशिंगमध्ये अद्ययावतता आणि आधुनिकता आणण्यासाठी तज्ज्ञ कारागिरांची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे इंट्रियाचे हिऱ्यांचे दागिने केवळ लग्न समारंभच नव्हे तर प्रत्येक प्रसंगात सहजपणे घालता येतील, असे आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली प्रशंसा इंट्रिया प्रदर्शनात यंदा हिऱ्यांच्या दागिन्यांची कुठली श्रृंखला सादर करण्यात येणार याबाबत बरेच कुतूहल होते. यामुळे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. आज दिवसभर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हिरे प्रेमीनी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी फुलली होती. या प्रदर्शनाला सायंकाळपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन दागिन्यांच्या डिझाईन्सची प्रशंसा केली. यात उद्योगपती, डॉक्टर्स मंडळी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कला क्षेत्रातील मान्यवर, फॅशन जगतातील लोकांचा सहभाग होता. प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवसदिवाळी आणि सणासुदीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हे प्रदर्शन मर्यादित कालावधीसाठी आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन उद्या १नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजतापर्यंत नागपूरकरांसाठी सुरू राहणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांचे नवनवीन डिझाईन्स अनुभविण्यासाठी नागरिकांनी लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा, आर्ट गॅलरीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन इंट्रियातर्फे करण्यात आले आहे.