सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत राज्य सरकारने खासगी ट्रॅव्हल्सने एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दीडपटीहून अधिक भाडे आकारू नये, असे नियम ठरवून दिले आहेत. मात्र, त्यानंतरही ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.सुट्यांच्या हंगामात रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशा अपूर्णच राहत असल्याने, प्रवाशांना खासगी बस किंवा ट्रॅव्हल्स कंपन्यांशिवाय पर्याय राहत नाही. याचा फायदा दरवर्षी घेतल्या जात असल्याचे नेहमीचे चित्र आहे. यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचे भाडे निश्चित करण्याचा निर्णय गेल्याच वर्षी शासनाने घेतला. हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुण्याच्या केंद्रशासित सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयीसुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. यात वातानुकूलित (एसी), वातानुकूलित नसलेली (नॉन एसी), शयनयान (स्लीपर), आसनव्यस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लीपर) वाहनांची वर्गवारी केली. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाते. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरूपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीट दर आकारणे बंधनकारक केले. परंतु तूर्तास चित्र वेगळे असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.१७३३ ऐवजी २००० रुपये भाडेदिवाळीच्या निमित्ताने नागपूर-पुणे व मुंबई-नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसटी महामंडळाच्या दीडपट भाडे आकारण्याच्या शासनाच्या निर्णनुसार नागपूर-मुंबई या अंतरासाठी साध्या खासगी बसेसला १४३२ रुपये, ‘नॉन एसी’ बसला १७३३ रुपये, ‘एसी’ बसला २०३५ रुपये, ‘एसी व्हॉल्वो’ला ३५११ रुपये तर ‘एसी स्लीपर’ बसला १९९७ रुपये भाडे आकारण्याचा नियम आहे. परंतु काही खासगी ट्रॅव्हल्सबसेस ‘नॉन एसी’ बससाठी सुमारे १९०० ते २००० तर एसी बससाठी २५०० ते ३००० रुपयांपर्यंतचे भाडे आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. याव्यतिरिक्त नागपुरातून महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
नागपुरात मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:45 AM
ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
ठळक मुद्देएसटीच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे नको आरटीओ करणार कसून तपासणी