लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने आॅनलाईन हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका महिलेसह तिघांना अटक केली.सौरभ राजेंद्र मून (वय २४), श्वेता सौरभ जैन (वय २२, रा. दोघेही, वाराशिवनी, बालाघाट) आणि केविन जॉन चक्कू ( वय २९, रा. पुट्टेपारमपील, केरळ), अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गेल्या काही महिन्यांपासून खरे टाऊन धरमपेठमध्ये भाड्याच्या सदनिकेत राहतात. अत्यंत टेक्नोसॅव्ही असलेले हे तिघे सोशल साईटवरून सेक्स रॅकेट चालवीत होते. त्यांनी संकेतस्थळावर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली राहुल आणि अर्जुन नाव टाकून आपला मोबाईल क्रमांक नमूद केला होता. या क्रमांकावर येणाऱ्या नंबरवर श्वेता लाघवी आवाजात ग्राहकांना पाहिजे तशी महिला आणि मुलगी उपलब्ध करून देण्याची बतावणी करायची. ग्राहकाच्या ऐपतीनुसार, त्याला महिला-मुलीचे दर सांगत होती. ग्राहकाने रक्कम जमा करताच धरमपेठसारख्या पॉश एरियातील खरे टाऊनमध्ये हे त्रिकूट त्याला सदाशिव अपार्टमेंटमधील सदनिका उपलब्ध करून देत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना कळाली. त्यांनी आपल्या सहकाºयांकडून शहानिशा करवून घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी एका बनावट ग्राहकाने सौरभ, श्वेता तसेच केविनसोबत संपर्क साधला. विशिष्ट रक्कम स्वीकारल्यानंतर या त्रिकुटाने ग्राहकाला एक देहविक्रय करणारी तरुणी उपलब्ध करून दिली. त्याचवेळी उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप, सहायक निरीक्षक संजीवनी थोरात, फौजदार अजय जाधव, हवालदार विजय गायकवाड, दामोदर राजूरकर, नायक संजय पांडे, अस्मिता मेश्राम, छाया राऊत, बळीराम रेवतकर, सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आणि शकुन सनेश्वर यांनी या कुंटणखान्यावर छापा घातला. यावेळी हे त्रिकूट तसेच वेश्याव्यसाय करणारी तरुणी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी बयान नोंदविल्यानंतर तिला सोडून दिले तर सौरभ, श्वेता आणि केविनला कलम ३७०, ३४ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.परप्रांतीय दलाल नागपुरातगंगाजमुनातील वेश्याव्यवसाय बंद पडल्यापासून गल्लोगल्ली पॉश कुंटणखाने सुरू झाले. ग्राहकांच्या पसंतीनुसार बाहेरूनही वेश्या बोलविल्या जातात. मात्र, परप्रांतातील आरोपींनी नागपुरात अशा पद्धतीने कुंटणखाना सुरू केल्याचे पहिल्यांदा उघड झाले आहे.