लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१६ सालापासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले, किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत महामार्गांवर १ हजार ५६४ अपघात झाले. यात १ हजार ३४१ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१९ मधील दोन महिन्यांतच ३७६ अपघातांत १९९ जण मरण पावले. तर १ हजार १५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.३८ महिन्यांत ३,६५९ बळी२०१६ पासूनची आकडेवारी पाहिली तर ३८ महिन्यांत नागपूर विभागातील महामार्गांवर ३ हजार ५८४ अपघात झाले. त्यात ३ हजार ६५९ नागरिक मरण पावले व ४ हजार २ नागरिक गंभीर जखमी झाले. याकालावधीत चार पोलिसांचा कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झाला.मृत्यूचे पाच ‘स्पॉट्स’महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाच्या अधिपत्याखाली एकूण १६ महामार्ग मदत केंद्र येतात. या हद्दीत पाच ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत. या ‘स्पॉट्स’वर सूचना फलकदेखील लावण्यात आले आहेत.१० अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभारमहामार्ग प्रादेशिक विभाग पोलिसांचा कारभार १० पोलीस अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. विभागाकडे ३४१ पोलीस कर्मचारी असून मोटार सायकल व जीप मिळून केवळ ४८ वाहने आहेत.
महामार्ग बनले मृत्यूचे सापळे : १४ महिन्यांत १५०० हून अधिक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:40 AM
महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
ठळक मुद्दे१३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू