शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

अपहरणकर्त्यांनी राहुलला जिवंतच पेटवून दिले ; आरोपी अद्याप बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 8:15 PM

विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या  आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही.

ठळक मुद्देवैद्यकीय सूत्रांकडून थरारक खुलासासमाजमन सून्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणाऱ्या  आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. दुसरीकडे अपहरण केल्यानंतर आरोपींनी राहुलला बुटीबोरी जवळच्या रामा डॅमजवळ नेले आणि त्याला मारहाण करून जिवंतपणीच पेटवून दिले,अशी थरारक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली असून, समाजमन सून्न झाले आहे.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे. नागपूर-विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक म्हणून आग्रेकर ओळखले जातात. सुरेश आग्रेकर यांना राहुल तसेच जयेश नामक मुले आहेत. मंगळवारी सकाळी राहुल घराबाहेर पडला. काही अंतरावरच आरोपी दुर्गेश आपल्या साथीदारांसह बोलेरोत बसून होता. त्याने राहुलला बोलेरोत बसवून घेतले. सकाळचे ११.३० झाले तरी राहुल घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे तो म्हणाला. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर राहुलच्या क्रमांकावर फोन आला. फोन करणाराने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. दुसरीकडे अपहरण आणि खंडणीची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही आरोपींनी दिली. आग्रेकर कुटुंबीयांनी दुपारी ४ च्या सुमारास लकडगंज पोलीस ठाण्यात या संबंधाने माहिती दिली. पोलीस राहुल आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत असतानाच बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जळालेला मृतदेह नागरिकांना दिसला. त्यानुसार, बुटीबोरी पोलीस तेथे पोहचले. राहुल आग्रेकरचे अपहरण झाल्याची माहिती असल्याने बुटीबोरी पोलिसांनी या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना कळविली. त्यानंतर लकडगंज पोलीस तेथे पोहचले. मृतदेहाजवळ चावीचा गुच्छा आणि अन्य चिजवस्तू आढळल्याने तसेच घटनेच्या वेळी आरोपींचे मोबाईल लोकेशनही तिकडेच दिसत असल्याने तो मृतदेह राहुलचाच असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. तशी माहिती लकडगंज पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, चेहरा ओळखू येत नसल्याने आग्रेकर कुटुंबीयांनी तो मृतदेह राहुलचा नसल्याचे सांगून तो ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यावरून या प्रकरणाची गुंतागुंत वाढली होती.अशी पटवली ओळखतो मृतदेह राहुलचा की दुसऱ्या  कुणाचा, असा प्रश्न पडल्याने पोलिसांनी मृतदेहाची डॉक्टरांकडून बारीकसारीक तपासणी करून घेतली. चार दिवसांपूर्वी राहुल पडला होता. यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. जखम मोठी नसली तरी ताजी होती. कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचारही केले होते. जळालेल्या मृतदेहाच्या डोक्यावरही ती जखम असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे बुधवारी रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राहुलचे निवासस्थान गाठून त्याच्या कुटुंबीयांना जखमेबाबत विचारणा केली. राहुल आणि घरच्यांनाच त्या जखमेबाबत माहीत होते. त्यामुळे पोलिसांनी सांगितल्यानंतर तो मृतदेह राहुलचाच असल्याचे कुटुंबीयांनी मान्य केले.दु:खाचा डोंगर कोसळल्याने शोकसंतप्त असलेल्या आग्रेकर कुटुंबीयांनी तशाही अवस्थेत आदर्श भूमिका घेतली. तो मृतदेह कुणाचाही असू द्या, सामाजिक बांधिलकीतून आम्ही त्याच्यावर अंत्यसंस्कार करू, असे म्हणत त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी केली.अंत्यदर्शन आणि आक्रोशगुरुवारी दुपारी २ च्या सुमारास आग्रेकर आणि त्यांच्या आप्तस्वकियांनी राहुलचा मृतदेह मेडिकलमधून  ताब्यात घेतला. दारोडकर चौकातील आग्रेकर यांच्या निवासस्थानी तो नेण्यात आला. तोपर्यंत राहुलच्या पत्नीला त्याची हत्या झाल्याचे वृत्त सांगण्यात आले. ते ऐकून पत्नी अर्पिताने एकच आक्रोश केला. काही वेळेतच परत येतो, असे सांगून गेलेला राहुल आता कधीच परत येणार नाही या जाणिवेमुळे अर्पिता आणि अन्य महिलांची स्थिती वारंवार बेशुद्धावस्थेसारखी होत होती. काही वेळ मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर राहुलची अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहवला जात नव्हता. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. गंगाबाई घाट येथे शोकसंतप्त वातावरणात राहुलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालात मारेकऱ्यांनी राहुलला जिवंतपणीच पेटवून दिले. त्याचमुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. यासंबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले.डीएनए टेस्टसाठी धावपळतो मृतदेह कुणाचाही असो, सामाजिक दायित्वातून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका आग्रेकर परिवाराने घेतली अन् समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. दरम्यान, तो मृतदेह राहुलचाच आहे की दुसऱ्या कुणाचा त्याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी डीएनए टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने करून घेतली असून, लवकरात लवकर अहवाल मिळावा म्हणून पोलीस संबंधित तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. एकूणच या प्रकरणात अंधारात असलेले सर्व पैलू शोधून काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, आरोपी दुर्गेश बोकडे आणि पंंकज हारोडे तसेच त्यांच्या साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके मध्य प्रदेश आणि लगतच्या राज्यातील गावात धावपळ करीत आहेत. आरोपींचे नातेवाईक आणि काही मित्रांकडूनही पोलीस आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Murderखून