नागपूर : विदर्भातील प्रमुख लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३२) यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या करणा-या आरोपींचा अद्याप छडा लागलेला नाही. दुसरीकडे अपहरण केल्यानंतर आरोपींनी राहुलला बुटीबोरी जवळच्या रामा डॅमजवळ नेले आणि मारहाण करून जिवंतपणीच पेटवून दिले,अशी थरारक माहिती वैद्यकीय अहवालातून पुढे आली आहे.मंगळवारी सकाळी राहुल घराबाहेर पडला. काही अंतरावरच आरोपी दुर्गेश आपल्या साथीदारांसह बोलेरोत बसून होता. त्याने राहुलला बोलेरोत बसवून घेतले. सकाळचे ११.३० झाले तरी राहुल घरी आला नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे तो म्हणाला. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर राहुलच्या क्रमांकावर फोन आला. फोन करणाराने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. अपहरण आणि खंडणीची वाच्यता केल्यास किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली.>अशी पटवली ओळखअहरणाअगोदर चार दिवसांपूर्वी राहुलच्या डोक्याला दुखापत झाली होती. कुटुंबीयांनी त्याच्यावर उपचारही केले होते. जळालेल्या मृतदेहाच्या डोक्यावरही ती जखम असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यावरुन तो मृतदेह राहुलचाच असल्याचे कुटुंबीयांनी मान्य केले़
अपहरणकर्त्यांनी राहुलला पेटवले जिवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 5:49 AM