नागपूर : बाॅयाेमेडिकल कचऱ्याचे व्यवस्थापन याेग्य पद्धतीने केले जात नसल्याने व्हेरायटी चाैकातील नासुप्रच्या इमारतीमध्ये असलेल्या हिंद पॅथाॅलाॅजी लॅबवर ५० हजार रुपयांच्या दंड ठाेठावण्यात आला. महापालिकेच्या न्यूसेन्स डिटेक्शन पथकाने (एनडीएस) ही कारवाई केली. शुक्रवारी एनडीएसचे पथक लॅबची पाहणी करायला गेले असता वैद्यकीय कचरा याेग्य पद्धतीने ठेवला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे दंड ठाेठावण्यात आला. यासह इतर १३ प्रतिष्ठान, दुकाने व कार्यालयांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला.
लक्ष्मीनगर झाेनमध्ये एका किराणा दुकानदारावर पाच हजार रुपये, धरमपेठ झाेनमध्ये एक लॅब व दुकानावर ५५ हजार रुपये, धंताेली झाेनमध्ये तीन प्रतिष्ठानांवर १५ हजार रुपये, गांधीबाग झाेनमध्ये रेडिमेड दुकानदारावर पाच हजार रुपये, सतरंजीपुरा झाेनमध्ये अंड्याच्या दुकानावर पाच हजार रुपये, लकडगंज झाेनमध्ये दाेन प्रतिष्ठानांवर १७ हजार रुपये तसेच आसीनगर झाेनमध्ये ऑइल कंपनी व मंगळवारी झाेनमधल्या दाेन प्रतिष्ठानांवरही दंड लावण्यात आला.