लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या देशात आजही हिंदीचे महत्त्व मोठे आहे. ही भाषा देशाची राष्ट्रभाषा व्हावी आणि देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी, असे मनोगत महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेच्या नागपूर विभागाच्यावतीने स्थानिक धनवटे सभागृहात शनिवारी हिंदी दिवस तथा भारतीय भाषा दिनानिमित्त विविध भाषांमधून आपला ठसा उमटविणाऱ्या आठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष अजय पाटील, आयोजक जगदीश जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान आशा पांडे (बहुभाषिक लेखिका), डॉ. वंदना खुशलानी (हिंदी), डॉ. प्रकाश खरात (मराठी), डॉ. अजहर हयात (उर्दू), मंदिरा गांगुली (बांगला), एस. प्रभुरामन् (तामिळ), कुसूम पटोरिया (संस्कृ त) यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विनोद आसुदानी (सिंधी साहित्य) अनुपस्थित होते.यावेळी उल्हास पवार म्हणाले, अलीकडे लोकशाहीमध्ये भाषिक अस्मिता अधिक तीव्र व्हायला लागल्या आहेत. असे असले तरी हिंदीचे स्थान सर्वत्र कायम आहे. ही देशाची राष्ट्रभाषा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त के ले. बहुभाषिकत्वामधून हिंदी अधिक सशक्त होईल, ही विनोबा भावे यांची धारणा होती. तर अन्य सर्व भाषांव्यतिरिक्त पाश्चिमात्य ही एक भाषा असावी, असे महात्मा गांधी यांचे मत होते.डॉ. गिरीश गांधी म्हणाले, भाषांप्रति आजही देशात तीव्रता असली तरी एका भाषेचे एकच राष्ट्र असणे शक्य नाही. देशातील सांस्कृतिक भिन्नता लक्षात घ्यावी लागेल. अन्य भाषांच्या समृद्धीशिवाय हिंदी समृद्ध होणे शक्य नाही. हिंदीला राजाश्रय मिळावा, भाषांतरातून हिंदी समृद्ध व्हावी.सत्कारानंतर डॉ. प्रकाश खरात, वंदना खुशलानी आणि आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त के ले. संचालन मनोज पांडेय यांनी तर उपस्थितांचे आभार अजय पाटील यांनी मानले.
देश जोडण्यासाठी हिंदी प्रबळ व्हावी - उल्हास पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:31 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाषा ही दोन मनांना आणि संस्कृतींना जोडण्याचे काम करते. विविध भाषा आणि भिन्न संस्कृतीच्या ...
ठळक मुद्देहिंदी दिवस :राष्ट्रभाषा सभाकडून साहित्यिकांचा सत्कार