लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ५९व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्याय अंतिम फेरीस सुरुवात झाली आहे. उडाण एक झेप व हेमेंदू रंगभूमीतर्फे सादर झालेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या नाटकाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच ही स्पर्धा विभागीय स्तरावर घेतली जात आहे. पुणे केंद्रापासून स्पर्धेस सुरुवात झाली आहे.गुरुवारी प्रवीण खापरे लिखित व दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ हे स्पर्धेतील पहिले नाटक सादर झाले. वर्तमान स्थितीचा आढावा घेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे विश्लेषण करत एका आगळ्यावेगळ्या नाट्यप्रयोगाचा आनंद रसिकांना घेता आला. विचारांची मूर्ती साकारणाऱ्या दोन कलावंतांपुढे अदृश्य असलेला विचार प्रकटतो. त्यामुळे, तयार होत असलेल्या मूर्तीत सावरकरांचा आत्मा प्रवेश घेतो. त्यातून निर्माण होणाऱ्या वैचारिक द्वंद्वाला विद्रोह या पात्राद्वारे कशी कलाटणी मिळते, याचे सुंदर चित्रण या नाटकातून झाले. नाटकात सावरकरांची भूमिका जयंत बन्लावार, विनयची भूमिका गजानन जैस, विरागची भूमिका यशवंत निकम, विद्रोहची भूमिका अभिषेक डोंगरे यांनी साकारली. नृत्य गायत्री फेंडर व ऋतुजा वडाळकर (जैन) यांनी केले. नृत्यदिग्दर्शन सूचना भावसार-बंगाले यांचे होते. प्रकाशयोजना ज्योती जोगी, नेपथ्य प्रशांत इंगळे, वेशभूषा ऋतुजा वडाळकर व रंगभूषा गायत्री फेंडर यांची होती तर रंगमंच व्यवस्था निशाद डबीर, श्रेयस मंथनवार, खुशाल रहांगडाले, जितेंद्र गोस्वामी, नमेश वाडबुधे व वेदांत रेखडे यांची होती. त्यानंतर अमरावती येथील श्री नटराज शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा संस्थेतर्फे सलिम शेख लिखित व हर्षद ससाणे दिग्दर्शित ‘कौमार्य’ या नाटकाचे सादरीकरण झाले. यात श्रेसस नाचनकर, सायली अतकरे, सौरभ अढाऊ, शुभम माथूरकर, प्राची ढोके, सुमित सपाटे, अश्विन जगताप, समीर भेराणे, आशिष ठेंगे, शिवानी कांबळे, प्रांजल दाखोडे, अक्षय चव्हाण, अभिषेक खेडकर, रोशन प्रजापती, मुक्ता बहाळे, गोपाल दमदर, सायली फुटाणे, वेद दाखोडे, रितेश पळसकर, प्रतीक सरैय्या यांच्या भूमिका होत्या.मोजून २० प्रेक्षकांची उपस्थितीहिंदी राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक बघता जी भीती व्यक्त केली जात होती, तेच चित्र उद्घाटन प्रयोगाला दिसून आले. स्पर्धेत दुपारी व रात्री अशा दोन सत्रात नाटके सादर होणार असल्याने, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार नाही, असे भाकीत वर्तवल्या जात होते. गुरुवारी दुपारी उद्घाटन प्रयोगाला मोजून केवळ २० प्रेक्षकांची उपस्थिती दिसून आली. त्यातही परीक्षक आणि सादर झालेल्या नाट्यप्रयोगाशी संबंधित कलावंतांचा समावेश होता, हे विशेष. शुक्रवारी सादर झालेल्या नाट्यप्रयोगालाही अशा स्थितीचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
हिंदी राज्य नाट्य स्पर्धा : व्हॉट अबाऊट सावरकरने अंतिम फेरीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:30 PM
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ५९व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्याय अंतिम फेरीस सुरुवात झाली आहे. उडाण एक झेप व हेमेंदू रंगभूमीतर्फे सादर झालेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या नाटकाने या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
ठळक मुद्देसंध्याकाळी ‘कौमार्य’चे सादरीकरण