शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

मोदींसोबतच हिंदू कट्टरपंथी होते ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सत्ता संचालित करणारी हिंदू कट्टरपंथी शक्ती नक्षलवाद्यांच्या ‘टार्गेट’वर होती. सव्वा वर्षांपूर्वी नक्षली समर्थक रोना विल्सन यांनी त्यांचे साथी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र पाठवून या योजनेला मूर्तरूप देण्यास सांगितले होते.

ठळक मुद्देरोड शोमध्ये करण्याचा होता गेम सव्वा वर्षांपूर्वी पाठविले पत्र

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सत्ता संचालित करणारी हिंदू कट्टरपंथी शक्ती नक्षलवाद्यांच्या ‘टार्गेट’वर होती. सव्वा वर्षांपूर्वी नक्षली समर्थक रोना विल्सन यांनी त्यांचे साथी कॉम्रेड प्रकाश यांना पत्र पाठवून या योजनेला मूर्तरूप देण्यास सांगितले होते. या खुलाशामुळे नेत्यांच्या सुरक्षेत तैनात असलेलेल दल आणि गुप्तचर संस्था नव्याने व्यूहरचना तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.पुणे पोलिसांनी देशातील विविध शहरांमध्ये धाडी टाकून कवी आणि नक्षली समर्थक वरवरा राव याच्यासह पाच लोकांना अटक केली आहे. राव यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली. सूत्रानुसार जून महिन्यात पुणे पोलिसांनी पाच लोकांना अटक केली होती.त्यांच्याकडून जप्त साहित्य व विचारपूसदरम्यान अनेक खुलासे झाले होते. एक पत्रही पोलिसांच्या हाती लागले होते. यात दहशतवादी संघटना लिट्टे यांनी ज्याप्रकारे मानवी बॉम्बच्या सहाय्याने राजीव गांधी यांची हत्या केली होती, त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्याचा उल्लेख होता. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांची विचारपूस करून यासंबंधात माहिती मिळविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठलेही यश हाती आले नाही. सूत्रानुसार तुरुंगात असलेल्या रोना विल्सन यांनी कॉम्रेड प्रकाश यांना १८ एप्रिल २०१७ रोजी हे पत्र लिहिले आहे. प्रकाश सध्या जंगलात नक्षलवादी कारवाया संचालित करीत आहे. या पत्रात म्हटले आहे की,‘मोदींच्या नेतृत्वातील हिंदू कट्टरवादी शक्तींना भयभीत करण्याच्या कामात आम्ही लागले आहोत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पराभव होऊनही मोदींच्या नेतृत्वात १५ पेक्षा अधिक राज्यांमध्ये यश मिळून भाजपचे सरकार बनले. हे असेच सुरू राहिल्यास पार्टीला (पोलिट ब्युरो सेंट्रल कमिटी) सर्व मोर्चांवर त्रास निर्माण होऊ शकतो. हे पार्टीसाठी २०१६ मध्ये सुरक्षा संस्थांद्वारा चालविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘ग्रीन हंट’पेक्षाही अधिक घातक ठरेल. या पत्रात कॉम्रेड किसन आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी ‘मोदीराज’संपविण्याच्या फॉर्म्युल्यावर अमल करण्यास सांगितले आहे. यासाठी राजीव गांधी हत्याकांडाच्या धर्तीवर विचार करण्यास सांगितले आहे. ‘पंतप्रधानांचा रोड शो’ या आॅपरेशनसाठी उपयुक्त असून कुठल्याही परिस्थितीत कसलाही त्याग करून पार्टी जिवंत राहणे सर्वोपरी आहे, असेही त्यात म्हटले आहे.नागपुरातही आले होते रावसूत्रानुसार १५ दिवसांपूर्वीच वरवरा राव भविष्यातील योजनांच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने नागपूरलाही आले होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांची पाहणीही केली होती. यादरम्यान एका स्थानिक नक्षली समर्थकाची भेटही घेतही होती. त्याची पत्नी सध्या तुरुंगात आहे. तीही काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटली आहे. नागपूर दौऱ्यातच नंबर दोनच्या नेत्यांच्या सुटकेवरही चर्चा करण्यात आली. हा नेता नागपूरच्या तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करण्यात आले, परंतु यश आले नाही. त्यामुळे त्याच्या सुटकेसाठी इतर पर्याय शोधले जात आहेत. पहिला पर्याय ‘नक्षली नेत्यास दुसऱ्या राज्यात शिफ्ट करून जेल ब्रेक करणे’ हा होता. राव यांच्या नागपूर दौऱ्यामुळे स्थानिक पोलिसांचीही झोप उडाली आहे.

७०० पत्रं सापडलीमिळालेल्या माहितीनुसार नक्षल समर्थक असल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या लोकांकडून पोलिसांना ७०० पत्रं सापडली आहे. ते पत्र त्यांनी वेळोवेळी एकमेकांना पाठवलेली आहेत. नक्षली नेते पेनड्राईव्हच्या माध्यमातून ही पत्रं एकमेकांना पाठवत होते. वाचून झाल्यावर ती नष्ट केली जात होती. जप्त करण्यात आलेले कॉम्प्युटर व लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या संशयास पुष्टी मिळाल्याचे सांगितले जाते. पोलीस यांचा पुरावा म्हणून वापर करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी