लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपा सरकारच्या पाठीशी नेहमीच उभी राहणारी अखिल भारत हिंदूसभा आता नागरिकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे. हिंदू महासभा आणि पारडी संघर्ष समितीने बुधवारी पारडी चौक, मेनरोडवर रास्ता रोको आंदोलन केले.पारडी येथील उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. गेल्या दोन वर्षांत रस्त्याची दुर्दशा आणि जीवघेण्या रस्त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या समस्यांचा आंदोलनात निषेध करण्यात आला. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी शासन आणि प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, १५ दिवसांच्या आत खराब रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण करून समस्या निकाली न काढल्यास संबंधित कंपनी, प्रशासन आणि शासनाच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. त्यांनी एनएचएआयवर खटला दाखल करण्याचा इशारा दिला.पारडी चौकात सकाळी १०.३० वाजता हिंदू महासभेचे विरोध प्रदर्शन सुरू झाले. कारेमोरे म्हणाले, खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. हिंदू महासभा पूर्वीही नागरिकांच्या मुद्यांवर उभी राहिली आहे आणि पुढेही जनहितार्थ हा प्रयत्न सुरूच राहील. नागरिक समस्येमुळेच प्रशासनाविरोधात रस्त्यावर आले आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र दिले आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे आंदोलन सरकारचा आणि त्याच्या कार्यप्रणालीचा विरोध आहे. पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले होते, हे विशेष. पण बांधकामाकडे लक्ष देण्यात आले नाही. यावेळी नागरिकांनी आपापल्या समस्या सांगितल्या.हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी पारडी चौकात नारेबाजी करून रस्त्यावरील वाहतूक बंद पाडली. याप्रसंगी सुरेश लंगे, कुलदीप परिमल, रोहित कांद्रीकर, प्रवीण मिश्रा, प्रवीण निशाणकर, मनोज वाडीभस्मे, लालू शाहू, नितीन बांते, प्रणित बसेन उपस्थित होते.एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना घेरावएनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी न आल्यास संपूर्ण रस्ता बंद करण्याचा इशारा हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी एनएचएआयचे व्यवस्थापक (तांत्रिक) भोला रमेश यांना घेराव घालण्यात आला. त्यांच्याशी चर्चा अपयशी ठरल्यानंतर, एनएचएआयचे अधिकारी येवतकर यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करण्यात आली. येवतकर यांच्या आश्वासनानंतर भोला रमेश यांनी १५ दिवसांत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. हिंदू महासभेने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी न पाठविल्याचा विरोध दर्शविला.
हिंदू महासभेचे नागपुरातील पारडीत रास्ता रोको : शासनाला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:51 AM
हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपा सरकारच्या पाठीशी नेहमीच उभी राहणारी अखिल भारत हिंदूसभा आता नागरिकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे. हिंदू महासभा आणि पारडी संघर्ष समितीने बुधवारी पारडी चौक, मेनरोडवर रास्ता रोको आंदोलन केले.
ठळक मुद्दे उड्डाणपुलाचे बांधकाम अपूर्ण, रस्त्याची दुर्दशा