शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नामकरणावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:29 PM

नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

ठळक मुद्देशासन निर्णय जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील १० जिल्हे थेट व १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षरीत्या जोडणाऱ्या नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, शुक्रवारी जारी केला. त्याचप्रमाणे, या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या ११ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यामुळे आता हा महामार्ग ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे. त्याचप्रमाणे, या प्रकल्पावरील कर्जाचा भार काही प्रमाणात हलका करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम भागभांडवली अनुदान म्हणून देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला होता. याही निर्णयासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयान्वये कर्जाची मंजूर पातळी २८ हजार कोटी रुपयांवर कायम ठेवण्यात आली असली तरी त्याची उचल सध्या मंजूर २४,५०० कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे, कर्जाचा उर्वरित भाग ३,५०० कोटी रूपये इतकी रक्कम शासनाकडून भागभांडवली अनुदान म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली असून जितके कमी कर्ज तितकी या प्रकल्पाची आर्थिक सुसाध्यता जास्त राहील, हे लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी आणखी ५ हजार कोटी रूपये इतके अतिरिक्त भांडवल अनुदान देण्यासही शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे