लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणघाट जळीत पीडिताला शुक्रवारी सायंकाळपासून श्वास घेणे कठीण झाल्याने, रात्री तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हे चांगले लक्षण नसल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, रविवारी महत्त्वाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पीडितेचा जीव वाचविण्यासाठी ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची चमू शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.पीडितावर उपचार करण्याचा शनिवार सहावा दिवस होता. हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल यांनी सांगितले, दिवसेंदिवस पीडित तरुणीची प्रकृती खालावत चालली आहे. तिचा श्वसनमार्ग जळाल्याने व फुफ्फुसही क्षतिग्रस्त झाल्याने पहिल्या दिवसापासून श्वास घेण्यास कठीण झाले होते. एक कृत्रिम नळी टाकून श्वास दिला जात होता. परंतु व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली आहे. हवेतून किंवा कुणाच्या संपर्कातून जंतू संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यामुळेच तिच्या कक्षातील इतर नऊ खाटा रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. तिचा जीव वाचविण्याचा सर्वाेतोपरी प्रयत्न सुरू आहे. औषधांमध्ये काही बदल करण्यात आला आहे.
हिंगणघाट जळीतकांड : जळीत पीडिता व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 8:12 PM
Hinganghat Burn Case : हिंगणघाट जळीत पीडिताला शुक्रवारी सायंकाळपासून श्वास घेणे कठीण झाल्याने, रात्री तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हे चांगले लक्षण नसल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देप्रकृती अत्यवस्थ