वर्षभरात विक्रमी विकास कामे करून नागपूर एचसीबीएने घडविला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 08:44 PM2018-06-14T20:44:23+5:302018-06-14T20:44:23+5:30

प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणताही अडथळा विकासाचा मार्ग रोखू शकत नाही, हे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए)च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात संघटनेने अवघ्या वर्षभरात विक्रमी कामे करून इतिहास घडविला. आकर्षक विकास कामांमुळे संघटनेच्या परिसराचा चेहरामोहरा पालटला आहे. सर्वात शेवटी विकसित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट चेंबर व मिटिंग हॉलचे गुरुवारी वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व आनंद जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संघटनेची विकास मोहीम या उद्घाटनानंतर १०० टक्के पूर्ण झाली.

History created by Nagpur HCBA by Vikrama Vikas works in a year | वर्षभरात विक्रमी विकास कामे करून नागपूर एचसीबीएने घडविला इतिहास

वर्षभरात विक्रमी विकास कामे करून नागपूर एचसीबीएने घडविला इतिहास

Next
ठळक मुद्देपरिसराचा चेहरामोहरा पालटला : गुरुवारी झाले अंतिम विकास कामांचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणताही अडथळा विकासाचा मार्ग रोखू शकत नाही, हे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए)च्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले. अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात संघटनेने अवघ्या वर्षभरात विक्रमी कामे करून इतिहास घडविला. आकर्षक विकास कामांमुळे संघटनेच्या परिसराचा चेहरामोहरा पालटला आहे. सर्वात शेवटी विकसित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट चेंबर व मिटिंग हॉलचे गुरुवारी वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व आनंद जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संघटनेची विकास मोहीम या उद्घाटनानंतर १०० टक्के पूर्ण झाली.
अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी स्वच्छतेची समस्या सोडविली. स्वच्छतेसाठी आऊटसोर्सिंग केले. संघटनेने वकिलांना वाटप केलेले लॉकर्स परिसरात अस्ताव्यस्त ठेवलेली होती. त्यामुळे मोकळेपणा जाणवत नव्हता. नवीन कार्यकारिणीने सर्व लॉकर्स एका ठिकाणी ठेवण्यासाठी नवीन जागा विकसित केली. त्या ठिकाणी लॉकर्स हलवल्यानंतर परिसर मोकळा व स्वच्छ झाला. सर्व परिसरात पीओपी, लायटिंग व कलरिंग करण्यात आले. वकिलांचे पाच मोठे हॉल्स व सहा खोल्यांचे वकिलांच्याच आर्थिक योगदानातून आकर्षक नूतनीकरण करण्यात आले. रंगरंगोटी, पीओपी, लायटिंग, पडदे, पंखे, फ्लोअर मॅट, नवीन टेबल व खुर्च्या यामुळे हॉल व खोल्या चकाचक झाल्या. परिसरात राज्यघटनेतील प्रस्तावनेची शिळा बसविण्यात आली. पार्किंग व्यवस्थेत प्रभावी बदल करण्यात आला. वकिलांना पक्षकारांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करता यावी यासाठी कॉन्फरन्स चेंबर तयार करण्यात आले. अ‍ॅड. आर. के. मनोहर स्मृती एचसीबीए ग्रंथालयाचे नूतनीकरण करण्यात आले. ग्रंथालयातील बसण्याची व्यवस्था सुधारण्यात आली. आवश्यकतेनुसार सर्व पुस्तके खरेदी करण्यात आली. ई-लायब्ररी अत्याधुनिक करण्यात आली. जागेच्या कमतरतेमुळे ३०० वकिलांच्या बसण्यासाठी जागा मिळण्याचे अर्ज प्रलंबित होते. संघटनेने उपलब्ध जागेतच नवीन विकासकामे करून १७० वकिलांना बसण्यासाठी जागा दिली. कॅन्टीन व स्वच्छतागृहाचा फाईव्ह स्टारप्रमाणे कायापालट करण्यात आला. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन वॉटर कूलर बसविण्यात आले. देशातील कोणत्याही न्यायालयात वकिलांच्या लिपिकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा नाही. परंतु, या संघटनेने लिपिकांसाठीही बसण्याची व्यवस्था करून आदर्श निर्माण केला. लिपिक व संघटनेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश ठरवून देण्यात आला. बाहेरगावातील वकिलांना बसण्यासाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली. यासह अन्य बरीच कामे संघटनेने केली.
हे आहेत संघटनेचे शिलेदार
विक्रमी कामांद्वारे आदर्श निर्माण करणाऱ्या संघटनेच्या शिलेदारांमध्ये अ‍ॅड. अनिल किलोर (अध्यक्ष), अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर (सचिव), अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. गौरी वेंकटरामन (उपाध्यक्ष), अ‍ॅड. भूषण मोहता (सहसचिव), अ‍ॅड. उमेश बिसेन (ग्रंथालय प्रभारी), अ‍ॅड. प्रीती राणे (कोषाध्यक्ष), अ‍ॅड. एस. आर. चरपे, अ‍ॅड. पी. एम. अंजीकर, अ‍ॅड. के. सी. देवगडे, अ‍ॅड. ए. ए. पन्नासे, अ‍ॅड. सोनाली सावरे, अ‍ॅड. मीर नगमान अली, अ‍ॅड. डी. ए. सोनवाणे, अ‍ॅड. जयश्री जुनघरे व अ‍ॅड. प्राची कोरटकर (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.
आता लक्ष्य नवीन इमारत
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांचा बंगला असलेल्या परिसरातील जमिनीचा एक तुकडा हायकोर्ट न्यायिक अधिकाऱ्यांसाठी कार्यालये व वकिलांना बसण्यासाठी खोल्या बांधण्याकरिता देण्यात आला आहे. तो भूखंड हायकोर्ट प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. या भूखंडावरील इमारत लवकरात लवकर बांधून पूर्ण करणे हे संघटनेचे आगामी लक्ष्य आहे.
अ‍ॅड. अनिल किलोर

Web Title: History created by Nagpur HCBA by Vikrama Vikas works in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.