लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरद ऋतूकडून वसंत ऋतूकडे जाण्याचा संधिकाळ म्हणजे होळी होय. हिंदू धर्मशास्त्रानुसार होळी पेटविण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी २ तास २६ मिनिटांचा आहे. संध्याकाळी ६.२७ ते रात्री ८.५३ वाजतापर्यंत होळी पेटविण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. सोमवारी पहाटे ३.०३ वाजतापासून फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होईल आणि रात्री ११.१८ वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असून, अहोरात्र हा जल्लोष साजरा करता येणार आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमी अर्थात शुक्रवार १३ मार्चपर्यंत हा सण साजरा केला जातो.
होळी दहनाचा मुहूर्त सायं. ६.२७ वाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 11:13 AM