लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत साेन्याचे दागिने व राेख एक लाख रुपये असा एकूण एक लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काटाेल शहरातील जवंजाळ ले-आऊट येथे शनिवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
विजय भाऊराव रेवतकर यांच्या घरी भाड्याने राहणारे साेनू नामदेव कळमधाड (२७, रा. भिष्णूर, ता. नरखेड) यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून दाराची कडी काढून अज्ञात आराेपीने घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील लाॅकरमध्ये ठेवलेले साेन्याच्या तिन अंगठ्या, कानातील झुमके असे एकूण १८ ग्रॅम साेन्याचे दागिने किंमत ५४ हजार रुपये आणि राेख एक लाख रुपये असा एकूण एक लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. दरम्यान साेनू कळमधाड यांचे पती ड्युटीवर जाण्यासाठी झाेपून उठले असता, त्यांना घराचा दरवाजा बाहेरून बंद दिसल्याने त्यांनी पत्नीला उठविले. तिने घरातील किचनमध्ये जाऊन बघितले असता, कपाट उघडलेले व तेथील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले.
याप्रकरणी साेनू नामदेव कळमधाड (रा. विजय रेवतकर यांच्या घरी, काटाेल) यांच्या तक्रारीवरून काटाेल पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत लभाणे करीत आहेत.