सावनेर : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख २३ हजार ५०० रुपये चाेरून नेले. ही घटना सावनेर शहरातील बले ले-आऊट येथे रविवारी (दि.१८) सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
बापूराव शंकरराव गिरी (४२, रा. वाॅर्ड क्र. ४, सावनेर) हे कुटुंबीयांसह लग्नानिमित्त बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील बेडरूममधील आलमारीमध्ये ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त फेकले व हॅण्डबॅगमध्ये स्टील डब्यात व साडीत गुंडाळून ठेवलेले ५०० रुपयाच्या नाेटाचे राेख २३,५०० रुपये चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच गिरी यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक कारंडे करीत आहेत.