दक्षिण-पश्चिममध्ये आनंदाचे वातावरणनागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील मतदारांनी आनंद व्यक्त केला. आमच्या घरचा मुख्यमंत्री झाला, अशी भावना मतदारांनी लोकमतकडे व्यक्त केली. हक्काचा माणूस मुख्यमंत्री झालासहज वागणारा, सर्वांना समजून घेणारा, स्वच्छ चारित्र्याचा, कुणालाही निराश न करणारा आपल्या हक्काचा माणूस मुख्यमंत्री झाला आहे. विशेष म्हणजे तो आमच्या मतदारसंघातून निवडून आला आहे. याच्यामुळे आनंद दुप्पट झाला आहे. जमिनीशी जुळलेला देवेंद्र खरा नेता आहे. मीना सूर्यवंशी, त्रिमूर्तीनगरनागपूर बघाच आता कसे चमकतेआमच्या मतदार संघातून निवडून गेलेला आमदार आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे राहिले. परिणामी विदर्भाची उपेक्षाच झाली आहे. त्याचा फटका आमच्या शहरालाही बसला आहे. आता आमचा आमदार मुख्यमंत्री झाल्याने बघाच आता नागपूर कसे चमकते. शबाना खान, जोगीनगर प्राऊड फिल होत आहेमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या नागपूरचा झाला आहे आणि तोही माझ्या मतदार संघातला असल्याने मला प्राऊड फिल होत आहे. आता केंद्र आणि राज्यातही भाजपाचे सरकार आहे. मुख्यमंत्री आमचे देवेंद्रभाऊच असल्याने, त्यांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न नक्कीच पूर्णत्वास येईल. बादल माटे, प्रतापनगरदिवाळीचे बंपर गिफ्ट मिळालेमहाराष्ट्रातील सर्वात तरुण, उच्चशिक्षित, समस्याची जाणीव असणारा, गुणवान, कर्तृत्ववान राजकारणी म्हणून देवेंद्र फ डणवीस यांची ओळख आहे. आता ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेले हे दिवाळीचे बंपर गिफ्ट आहे. समीर करपे, सुंदरवन कॉलनीयुवा वर्गाची स्वप्नपूर्ती झालीयुवा नेता म्हणून ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील युवकांबरोबरच नागपुरातील युवकांनाही मोठी अपेक्षा आहे. त्यांची युवांप्रति असलेली दृष्टी प्रगल्भ आहे. नगरसेवक, महापौर, आमदार ही भूमिका वठवितांनाही त्यांनी युवकांना झुकते माप दिले आहे. आता तर ते मुख्यमंत्री बनणार आहे. नागपूरसह विदर्भातील युवकांचे बेरोजगारीचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, रखडलेला मिहानचा प्रकल्प पुन्हा मार्गी लागेल. युवा वर्गाला अपेक्षित असाच मुख्यमंत्री झाला आहे. अवंतिका झाडे, सीतानगरआता विदर्भाला न्याय मिळेलआमदार म्हणून त्यांनी विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचे सभागृह गाजविले. त्यांचा अभ्यास आणि विषयावर असलेली पकड यामुळे त्यांनी उचललेल्या प्रश्नांवर मंत्रीही सावधपणे बोलायचे. विदर्भातील अनेक समस्यांना, प्रश्नांना सरकारदरबारी मांडले आहे. मात्र राज्याच्या सत्तेवर पश्चिम महाराष्ट्राचे प्रभुत्व असल्याने विदर्भाकडे दुर्लक्षच झाले होते. आता विदर्भाचा खरा माणूस मुख्यमंत्री झाल्याने, विदर्भाला न्याय मिळेल.मीनल चव्हाण, भामटीस्वप्नपूर्ती झालीनिवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईल, असे भाकित मी वर्तविले होते. अनेकांशी शर्यतीही लावल्या होत्या. कारण त्याच्यासारखा परिपक्व राजकारणी, त्याच्यातील गुणवत्ता, वरिष्ठांचा त्याच्यावर असलेला आशीर्वाद आणि निष्कलंक असणाऱ्या फडणवीस यांनी निवडणुकीचे नेतृत्व केले होते. महाराष्ट्रात देवेंद्रसारखा नेताच नाही, अशी माझी भावना आहे. माझी तर स्वप्नपूर्तीच झाली.लक्ष्मण लोखंडे, रमाबाई आंबेडकरनगर, जयताळासरकार दारी आलेआजपर्यंत नागपुरात अनेक नेत्यांना मंत्रिपद मिळाले, मात्र ते नेते जनतेला आपलेसे वाटत नव्हते. नागपूरच्या जनतेला पहिल्यांदाच खरा मंत्री मिळाला आहे आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या रूपात मिळाल्याने, आता सरकारच आपल्या दारी आल्यासारखे वाटते.राजू निनावे, जुनी अजनीनागपूरकरांसाठी आज खरी दिवाळीमतदारसंघातील बहुतांश मतदारांना देवेंद्र फडणवीस हा आपल्या घरचा माणूस वाटतो. त्यामुळे गेली तीन टर्म मतदारांनी त्याला साथ दिली. त्यानेही मतदारांना निराश केले नाही. त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकीची भावना आहे. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात होते. मात्र काही नेत्यांनी त्यावर दावा केला होता. त्यामुळे नागपूरकर निराश होते. या निराशेतच त्यांनी दिवाळी साजरी केली. आज मात्र पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्याने, आम्हा नागपूरकरांसाठी आज खरी दिवाळी आहे. उन्नती सातपुते, पार्वतीनगर आता तक्रारी नाही, फक्त प्रगतीराज्याच्या सत्तेवर आजपर्यंत विदर्भाबाहेरच्या नेत्यांचे प्रभुत्व राहिल्याने, विदर्भावर वर्षानुवर्षे अन्याय होत राहिला. त्यामुळे विदर्भातील अनेक प्रकल्प रखडले, शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली. बेरोजगारी, कुपोषण, नक्षलवाद, भारनियमन या समस्यांनी विदर्भाला ग्रासले. या तक्रारींच्या फायलीचे गठ्ठे सरकार दरबारी पडून पडून कुजले. देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने नागपूरसह विदर्भाचे महत्त्व वाढल्याने आता समस्यांच्या तक्रारी बंद होऊन, फक्त प्रगती होईल. सुनील दुर्गे, भगवाननगर
घरचा मुख्यमंत्री
By admin | Published: October 29, 2014 12:38 AM