लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेतू केंद्र्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सेतूकेंद्र्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्टसेवेद्वारे थेट अर्जदारांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत ९१ हजार ५६९ प्रमाणपत्र नागरिकांना घरपोच उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.जिल्हा सेतूकेंद्र्र तसेच तालुका सेतूकेंद्र दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यासाठी नागरिकांच्या सोयीकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतात. हे अर्ज महाआॅनलाईन यांनी विकसित केलेल्या आॅनलाईन प्रणाली अर्ज स्कॅन करून जमा करण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असतो. नेट कनेक्टीव्हीटीची अडचण तसेच सर्व्हरचा प्रॉब्लम झाल्यास अर्जदाराला अर्ज सादर करण्यास बराच वेळ लागत असतो. त्यामुळे अर्जदारांकडून वादविवाद होत असल्यामुळे आॅफलाईन अर्ज करण्याची सुविधा जिल्हा सेतूकेंद्र्रामध्ये करण्यात आली आहे.सेतूकेंद्र्रामध्ये अर्जदारास स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा लागतो, शपथपत्र व प्रमाणपत्राकरिता फोटो काढावा लागतो व प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते भारतीय पोस्ट सेवेद्वारे घरपोच उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यामुळे दलालाचा प्रश्नच येत नाही. सेतूकेंद्र्रामध्ये अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र घरपोच देण्याची सुविधा असून ११ मे पर्यंत ९१,५६८ प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले आहेत. शपथपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र नागरिकांनी अर्ज सादर करता अर्ध्या तासामध्ये जिल्हा सेतूकेंद्र्रातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. एप्रिल अखेरपर्यंत शपथपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे एकूण ९७,३८१ नागरिकांना तात्काळ निर्गमित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क कायद्यामध्ये नेमून दिलेल्या कालावधीपेक्षाही कमी कालावधीत नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधामाध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सेतू केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना सहज व सुलभपणे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे यादृष्टीने प्रशासनातर्फे पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपुरात ९० हजारावर प्रमाणपत्रांचे घरपोच वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 3:48 PM
सेतू केंद्र्रामार्फत नागरिकांच्या सुविधेकरिता आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सेतूकेंद्र्रामध्ये अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसाचे आत प्रमाणपत्र पोस्टसेवेद्वारे थेट अर्जदारांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेअंतर्गत ९१ हजार ५६९ प्रमाणपत्र नागरिकांना घरपोच उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
ठळक मुद्देअश्विन मुदगल : डायरेक्ट टू होम सेवा