शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अनुसूचित जातीच्या प्रत्येक कुटुंबाला घर

By admin | Published: February 07, 2016 3:03 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जि.प. मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरणनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. २०१९ पर्यंत या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर दिले जाईल. त्यासाठी राज्य सरकारने निधीचे नियोजन केले आहे. घर निर्मितीसाठी विशेष सेल तयार करण्यात आला आहे. यासोबतच ग्राम विकास खात्यांतर्गत यंत्रणा उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने दीक्षाभूमीच्या विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ९ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, एवढ्याने होणार नाही. आपण नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांसी चर्चा केली असून दीक्षाभूमीच्या विकासाचा १५० कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. या आराखड्याला मंजुरी देण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देश विकासाच्या दिशेने जात आहे. जगाताली सर्व संविधानात भारतीय संविधानाचा पहिला क्रमांक लागतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ताकद संविधानात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मध्यप्रदेशने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. मध्यप्रदेशचा पॅटर्न पाहिला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ लाख शेततळे देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच ठिंबक सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला जात आहे. ठिंबक सिंचनासाठी लागणारे कृषी साहित्य महागात पडते. त्यामुळे येत्या काळात या साहित्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून किंमती ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, आशीष देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जून रेड्डी, नागो गाणार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, संध्या गोतमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारणारे मूर्तीकार शंतनु इंगळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा आवर्जून उल्लेख पालकमंत्री बावनकुळे व जि.प. अध्यक्ष सावरकर यांनी केला. या सोहळ्यात हार तुऱ्याचा खर्च न केल्यामुळे वाचलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.(प्रतिनिधी)नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त करूराज्यातील पाच हजार गावे हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. येत्या काळात नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे ध्येय असून त्यासाठी शासकीय यंत्रणेने कामाला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.महिला बचत गटांसाठी मॉलमहिला बचत गटांचे मॉल उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेने सर्वात पहिला प्रस्ताव पंडित बच्छराज व्यास चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेचा दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली असून आणखी एक प्रस्ताव जिल्हा परिषदेने सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मिहानमध्ये लॉजिस्टीक पार्कला मंजुरी देण्यात आली असून १५०० कोटींची गुंतवणूक होत आहे. यातून युवकांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.