शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

‘होम आयसोलेशन’मुळेच वाढताहेत ‘पॉझिटिव्ह?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 7:59 AM

नागपूर जिल्ह्यातील १७ सीसीसीमध्ये ४७६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये तब्बल ५,२७३ रुग्ण आहेत. रुग्णवाढीला असे होम आयसोलेशन कारण ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसीसीसी नको, होम आयसोलेशनच हवे! घरातील विलगीकरणात ५,२७३ रुग्णसीसीसीमध्ये केवळ ४७६ रुग्ण

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर (सीसीसी) किंवा घरी स्वतंत्र सोय असल्यास विलगीकरण म्हणजे ‘होम आयसोलेशन’ करण्याचे निर्देश आहेत. परंतु सोय नसतानाही बहुसंख्य रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. परिणामी, घरातील सदस्यच नव्हे तर शेजाऱ्यांनासुद्धा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यातील १७ सीसीसीमध्ये ४७६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये तब्बल ५,२७३ रुग्ण आहेत. रुग्णवाढीला असे होम आयसोलेशन कारण ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणांनुसार वर्गीकृत केले जाते. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांनुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. परंतु आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जाते. त्यापूर्वी संबंधित डॉक्टरला रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करावे लागते. होम आयसोलेशनमध्ये रुग्णाला हवेशीर बंद खोलीत राहावे लागते, शक्यतो स्वतंत्र शौचालय असावे लागते, घरात फिरण्यावर बंधने असतात, घराबाहेर पडण्यावर प्रतिबंध असतो, सर्जिकल मास्क वापरणे व दर सहा ते आठ तासाने बदलावे लागते, मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५ टक्के) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (५ टक्के) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावे लागते, घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू अ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह असावे लागते, या सर्व सोयी असल्यावरच व तसे रुग्णाने प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरच रुग्णाला होम आयसोलेशन केले जाते. परंतु नागपुरात सर्वच स्तरात पसरलेल्या कोरोनाचे रुग्ण पाहिल्यास अनेकांच्या घरी सोयी नसतानादेखील होम आयसोलेशन होत आहे. हे धक्कादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.-शहरात पाच सीसीसीमधील दोन पूर्णत: रिकामेनागपूर जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. १०९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १६,७३३ वर पोहचली. ७,९७९ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील केवळ २५४ रुग्ण सीसीसीमध्ये आहेत. शहरात आमदार निवास, व्हीएनआयटी, पाचपावली, वनामती व ओरिएन्ट ग्रॅण्ड या खासगी हॉटेल्समध्ये सीसीसी सुरू आहे. परंतु ओरिएन्ट ग्रॅण्ड हॉटेल व वनामती सीसीसी पूर्णत: रिकामे आहे. तर आमदार निवासात १४९, व्हीएनआयटीमध्ये ४३ तर पाचपावली सीसीसीमध्ये ६२ रुग्ण उपचार घेत आहेत.-ग्रामीणमध्ये २२२ रुग्णच सीसीसीमध्येग्रामीण भागात बुधवारपर्यंत ग्रामीणमध्ये ४,२१३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. यातील २२२ रुग्णच सीसीसीमध्ये आहेत. तसे पाहिल्यास विविध १२ तालुक्यात सीसीसी सुरू करण्यात आले. परंतु कुठे चार तर कुठे ४५ रुग्ण दाखल आहेत. येथेही मोठ्या संख्येत रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस