शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

गृहमंत्र्यांच्या नागपुरातील धडाकेबाज कारवाईचे कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:53 AM

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी होमटाऊनमध्ये गुरुवारी रात्री केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

ठळक मुद्देसुजल सावजीसह विविध प्रतिष्ठानांमध्ये धडकले : जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, हॉटेल, पानठेले बंद करण्याचे निर्देश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनातर्फ जारी करण्यात आले असताना गुरुवारी शहरातील काही मंडळीनी आपली दुकानदारी बिनधास्तपणे सुरू ठेवली असल्याची तक्रार गृहमंत्री देशमुख यांच्याकडे काही सुजाण नागरिकांनी केली. देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत लागलीच अशा प्रतिष्ठानांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेत धडक दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी होमटाऊनमध्ये गुरुवारी रात्री केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास देशमुख यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना रविभवन येथे बोलविले. देशमुख यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांसोबत सदर, अजनी आणि बजाजनगरात काही ठिकाणी छापे घातले. गृहमंत्र्यांचा ताफा बजाजनगरमध्ये सुजल सावजी भोजनालयात धडकला. यावेळी भोजनालय बंद असल्याचे मालकाने सांगितले. आतमध्ये पाहणी केली असता एक ग्राहक जेवताना दिसला तसेच किचनमध्ये मोठ्या प्रमाणात जेवण तयार होत असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांना दिसून आले. त्यांनी याबाबत सुजलच्या संचालकाकडे विचारणा केली. समाधानकारकर उत्तर मिळत नसल्याचे पाहून गृहमंत्री देशमुख यांनी बजाजनगर पोलिसांना सुजल सावजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सुजल सावजीचे संचालक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली भादंविच्या कलम १८८ अन्वये कारवाई केली.सोशल मीडियावर व्हायरलगृहमंत्र्यांच्या या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे लपूनछपून, आतल्या दाराने दुकानदारी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. गुरुवारी गृहमंत्र्यांनी केलेल्या या कारवाईचा परिणाम शुक्रवारी उपराजधानीत बघायला मिळाला. हॉटेल्स, मॉल, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांपासून चहा टपरी आणि पान टपरीवाल्यांपर्यंत अनेकांनी आपली दुकानदारी बंद ठेवण्यातच धन्यता मानली. शुक्रवारी बिनबोभाटच काय लपूनछपून दुकानदारी करण्याचीही तसदी कुणी घेतली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखraidधाड