आॅनलाईन लोकमतनागपूर : पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.शत्रुघ्न मनीराम रंदई (६०, रा. सायगाव, ता. भिवापूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे. शत्रुघ्न हा गाई चारण्यासोबत मध गोळा करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह करायचा. तो सोमवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. वाटेतील पिंपळाच्या झाडावर त्याला मधाचे पोळे दिसले. त्याचवेळी त्याने पोळ्यातील मध काढण्याचे ठरविले. सायंकाळी घरी परतल्यानंतर तो रात्री ११ वाजताच्या सुमारास कडाक्याची थंडी असूनही पुन्हा मध काढण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ गेला.त्याने झाडावर चढून मध गोळा करण्यासाठी लोखंडी बादली पोळ्याच्या खाली बांधली आणि उतरायला लागला. त्यातच त्याच्या हाताला मध लागले आणि त्याची झाडाच्या फांदीची पकड सैल होऊन हात घसरला. त्यामुळे तो खाली कोसळला. मात्र, जमिनीवर पडण्याऐवजी मध्येच फांदीला अडकला. त्यात गंभीर मुका मार लागल्याने तो झाडावरच बेशुद्ध पडला आणि काही वेळातच झाडावरच त्याचा मृत्यू झाला.तो रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी सकाळी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तो पिंपळाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह झाडावरून काढत उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.थंडीमुळे मदत मिळाली नाहीशत्रुघ्नने झाडावरून कोसल्यानंतर लगेच मदतीसाठी आरडाओरड केली असेल. परंतु, मध्यरात्री या शिवारात फारसे कुणी राहात नसल्याने तसेच कडाक्याची थंडी असल्याने कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही. शिवाय, तो मध गोळा करण्यासाठी एकटाच गेला होता. झाडाच्या फांदीचा मुका मार आणि थंडी यामुळे तो झाडावरच गतप्राण झाला.
पोळ्यातील मध काढणे जीवावर बेतले, गुराख्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 7:16 PM
पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या सायगाव शिवारातील घटनाझाडावरून पडला आणि झाडातच अडकला