शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

नागपूर जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक आशांचा सन्मान

By गणेश हुड | Published: August 06, 2024 9:04 PM

जिल्हा परिषदेतर्फे आयोजन : आरोग्य केंद्रांना सोलर पॅनल व  इनव्हर्टर उपलब्ध करणार

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरोग्य यंत्रणेतील महत्वाचा दुवा असलेल्या आशा स्वयंसेविका तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र सेवा देतात. त्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल म्हणून जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा जिल्हा स्तरिय सन्मान सोहळा मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उत्साहात पार पडला. दोन हजारांहून अधिक आशा स्वयसेविका , गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, जिल्हा समुह संघटक यांना सन्मानचिन्ह देवुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा  राऊत  यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार अनील देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, कुंदा राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सभापती अवंतिका लेकुरवाळे, प्रविण जोध ,राजकुमार कुसुंबे, मिलींद सुटे, जि.प. सदस्य संजय जगताप,  सुभाष गुजरकर, दिनेश बंग, निलीमा उईके,  अरुण हटवार,  सलील देशमुख, कविता साखरवाडे, पुष्पा चाफले, मनिषा फेंडर, वंदना बालपांडे,प्रमिला दंडारे, ज्योती सिरसकर,दीक्षा मुलताईकर, देवानंद कोहळे, महेंद्र डोंगरे यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती व  पं. स. सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.  यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची महत्वाची भूमिका बजावत आहेत. जि.प.च्या सर्व ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच  ज्या उपकेंद्रात प्रसुती दर जास्त आहे. त्या उपकेंद्राना  इनव्हर्टर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती कुंदा राऊत यांनी यावेळी दिली.  तसेच  ज्या उपकेंद्रावर विद्युत देयके भरण्यास आर्थिक अडचन आहे. अशा ठिकाणी सोलर पॅनल उपलब्ध करण्याचा  मानस त्यांनी व्यक्त केला. 

मुक्ता कोकड्डे म्हणाल्या, आशा स्वयंसेविकांना माता व बाल संगोपन कार्यक्रमतंर्गतील कामे, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम, कुटुंब नियोजनाची कामे, पोषण आहार कामे, संसर्गजन्य आजाराची कामे, असंसर्गजन्य आजाराची कामे, व नाविण्यपुर्ण कामे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत यशस्वीपणे पार पाडतात.  सोम्या शर्मा  यांनी आशा स्वंयसेविकाचे समस्यांचे निराकरण करण्यास  कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.

टॅग्स :nagpurनागपूर