शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

नागपूर सत्र न्यायालय : हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 11:45 PM

सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देहाँगकाँग, चीन, दुबई, थायलंडला कार्यक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. अतिरिक्त न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी मंगळवारी हनीसिंगला हा दिलासा दिला. हनीसिंगला यापूर्वीही दोन-तीनदा विदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.देश सोडण्यापूर्वी विदेशातील राहत्या ठिकाणचा पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी, कार्यक्रमांची यादी व विमानाचे तिकीट याची माहिती तपास अधिकाऱ्याला देण्यात यावी. तसेच, देशात परत आल्यानंतर १० डिसेंबर रोजी या न्यायालयाला कळवावे, असे हनीसिंगला सांगण्यात आले आहे. हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ ऑक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्याने हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंडला जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज मंजूर झाला. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, जब्बलतर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नंदनवार यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय