ठळक मुद्देरेशिमबागेत झाली बैठक
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: श्रीराम जन्मभूमीकरिता २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलोर व नागपुरातून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या संदर्भात शनिवारी रेशिमबागेत बैठक घेण्यात आली. या बैठकीचे संचालन सनंथ गुप्ता यांनी केले. यावेळी रा.स्व.संघ, विहिंप, बजरंग दल, महिला प्रमुख व अन्याय परिवार संघटनेचे प्रमुख उपस्थित होते. व्यासपीठावर दीपक तामशेट्टीवार, राजेश लोया, श्रीधरराव गाडगे, अरुण नेटके, निलंदावार शेंडे होते.ही रॅली नागपुरात ईश्वर देशमुख क्रीडा मैदानात आयोजित करण्यात आली आहे.