डॉ. अंशुल चढ्ढा, डॉ. निर्मल पटले, डॉ. ललित राऊत, डॉ. आशिष गांजरे, डॉ. विकास गुप्ता, डॉ. अनंतसिंग राजपूत, डॉ. परिक्षित महाजन, डॉ शब्बीर राजा
विविध हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने एकत्रित येऊन ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या हॉस्पिटलची स्थापना तीन वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेज रोडवर, राजाबाक्षा हनुमान मंदिरासमोर केली. रुग्णांवर एका छताखाली अद्ययावत आणि यशस्वी उपचार देण्यात हॉस्पिटलने मध्य भारतात नावलौकिक मिळविला आहे. कॉर्पोरेटऐवजी या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना रुग्णांवर स्वतंत्र उपचार करण्याची मुभा आहे. अद्ययावत उपकरणांनी सज्ज हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हॉस्पिटलने विशेष काम केले आहे. किफायत व तत्पर रुग्ण सेवा, हे हॉस्पिटलचे ब्रीदवाक्य आहे.
डॉ. अंशुल चढ्ढा, डॉ. निर्मल पटले, डॉ. ललित राऊत, डॉ. आशिष गांजरे, डॉ. विकास गुप्ता, डॉ. अनंतसिंग राजपूत, डॉ. परिक्षित महाजन, डॉ शब्बीर राजा या डॉक्टरांनी एकत्रित येऊन तीन वर्षांपूर्वी हॉस्पिटलची स्थापना केली. येथे अॅनेस्थेसियोलॉजी, बेरिएट्रिक व लॅपरोस्कोपिक सर्जरी, बे्रन व स्पाईन सर्जरी क्रिटिकल केअर युनिट, कार्डियोलॉजी व कॅथ लॅब, कार्डियोथोरेसिक व व्हॅस्क्युलर सर्जरी, डायलेसिस व रिनल ट्रान्सप्लांट, कान, नाक व घसा, एन्डोक्रायनोलॉजी व डायबेटोलॉजी, जनरल सर्जरी व मिनिमल एक्सेस सर्जरी, गॅस्ट्रोएन्टिरोलॉजी व गॅस्ट्रोएन्स्टेटिनल सर्जरी आदी विश्वस्तरीय सुविधा किफायत दरात आहे. २४ तास रेडिओलॉजी सर्व्हिस, ३० खाटांचे इन्टेन्सिव्ह केअर युनिट, ४ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, पॅथाॅलॉजी, फार्मसी, अॅम्ब्युलन्स सेवा आहेत. अॅडव्हांस सर्जरी हॉस्पिटलमध्ये होतात.
डॉक्टरांनी म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर्स आपापल्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट असून त्यांना रुग्णांवर उपचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. अनेकदा रुग्णांना आर्थिक अडचणी येतात. पण त्याची चिंता न करता रुग्णांवर प्रथम उपचार केले जातात. एका ३२ वर्षीय रुग्णाकडे पैसे नसतानाही हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली, हे विशेष. आम्ही जे करतो, त्याचे यश म्हणून हॉस्पिटलला अडीच वर्षांतच एनएबीएच प्रमाणपत्र आणि स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या एजन्सीकडून एक वर्षापूर्वी कायाकल्प प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारे ऑरियस नागपुरातील काहीच हॉस्पिटलपैकी एक आहे. प्रामाणिकपणा, रुग्णांची काळजी, आवश्यक तत्पर सेवा, अद्ययावत सर्जरी, उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूमुळे हे प्रमाणपत्र हॉस्पिटलला मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
डॉक्टर्स म्हणाले, १०० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये तीन वर्षांत २५ डॉक्टरांच्या चमूने जवळपास ३० हजार रुग्णांवर यशस्वी उपचार आणि तीन हजारांपेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत. कोविडच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेत १०० टक्के फुफ्फुस खराब झालेले रुग्णही ठीक होऊन घरी गेले आहेत. हे डॉक्टरांचे यश आहे. हॉस्पिटलचा रिकव्हरी रेट चांगला आहे. कोविड आजारात फुफ्फुस आणि हृदय कमजोर होतात. त्याकरिता ईसीएमओ लाईफ सपोर्ट मशीन आहे. कोविडच्या काळात हॉस्पिटलचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले. हॉस्पिटलचा परिसर वारंवार स्वच्छ करण्यावर भर दिला. डॉक्टरांसोबत नर्स आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात आली. कोविड झालेल्या कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार केले. त्यांच्या न्यूट्रिशनची, खाण्याची आणि निवासाची काळजी घेतली. त्यांचा वैद्यकीय विमा काढला होता. पीपीई किट घालणे व बदलविणे, आंघोळ ते घरी जाण्यापर्यंतची स्वतंत्र व्यवस्था होती.
कोविड काळात शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले. गंभीर रुग्णांना प्राधान्य दिले. रुग्णांना वर्गवारीनुसार वेगळे केले. हॉस्पिटलच्या खुल्या परिसरात ओपीडी चालवून जवळपास ५ हजार रुग्णांची तपासणी केली तर ३ हजार रुग्णांना भरती करण्यात आले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार ८० टक्के रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले. १०० टक्के रुग्णांवर शासकीय दरानुसार उपचार केले आहेत. हे कोणत्याही हॉस्पिटलने केल्याचे दिसून येत नाही. पूर्वीचे सेटअप असल्याने हॉस्पिटल कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठीही तयार आहे. कोणत्याही गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सज्ज आहे.
सामाजिक उपक्रमांतर्गत हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय शिबिराचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. गडचिरोली येथे ३०० रुग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे. प्रत्येक रुग्ण निरोगी आणि सुदृढ व्हावा, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांची चमू झटत असून भविष्यातही रुग्णांना अद्ययावत सेवा तातडीने उपलब्ध करून देण्याचा डॉक्टरांचा मानस आहे.