लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बनावट सह्या आणि खोट्या नोंदी करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ६ लाख, २२ हजार ६९० रुपये हडपल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनाडे चौकात असलेल्या सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉस्पिटलचे संचालक शोएब हुसेन हैदर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडे आरोपी नितेश महल्ले, सदानंद सोंगणजीर, सुरज हिंगे, अभिलाष मोरे आणि प्रणाली कदम हे कर्मचारी म्हणून काम करत होते. या पाच जणांनी एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२० या दरम्यान हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची अनामत रकम परत केल्याची खोटी नोंद करून त्यावर डॉक्टरांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि ६ लाख २२ हजार, ६९० रुपयांची अफरातफर केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी शोएब हुसेन यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींची चौकशी सुरू आहे.
हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी केली अफरातफर : सव्वासहा लाख रुपये हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 9:27 PM
हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बनावट सह्या आणि खोट्या नोंदी करून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी वर्षभरात ६ लाख, २२ हजार ६९० रुपये हडपल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
ठळक मुद्देडॉक्टरांच्या बनावट सह्या, खोट्या नोंदी