लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले.नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनचे (एनआरएचए) सदस्य आणि कर्मचाऱ्यांसाठी फायर मार्शल प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सभेचे आयोजन करण्यात आले. मंचावर मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, माजी अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, उपाध्यक्ष इंदरजित सिंग बावेजा, सचिव दीपक खुराणा आणि कोषाध्यक्ष विनोद जोशी उपलब्ध होते.रेणू म्हणाले, आग लागण्याची घटना ही एक दुर्घटना आहे. प्रशिक्षण कार्यशाळेत आग विझविणे आणि अन्य उपकरणांचा प्रभावी उपयोग करणे आणि स्थिती आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.राजेंद्र उचके यांनी या प्रशिक्षणासाठी मनपाशी संपर्क साधण्यासाठी एनआरएचएची प्रशंसा केली. हे प्रशिक्षण कायद्यानुसार आवश्यक आहे. आमची चमू नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. त्याकरिता नाममात्र खर्च येतो. त्याचे वहन एनआरएचएने करावे. बॅचेसमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येकाला अग्निसुरक्षा उपकरणे हाताळण्याची संधी प्राप्त होणार आहे.बैठकीत एनआरएचएच्या सदस्यांमध्ये गोविंद मुदलीयार, अजय जयस्वाल, संजय अग्रवाल, तरुण मोटवानी, अफजल मीठा, वासुदेव त्रिवेदी, महेश त्रिवेदी, रिषी तुली, मोहम्मद अनिस ओपई, नागेश वझलवार, विजय सावरकर, अमित रघटाटे, शारीक हफीज, शिवम गुप्ता, सुद् वैद्य, मनोज शुल्का, तुषार खुराणा, चंद्रकांत चौरसिया, अर्जुन बुंदीवाल, राजेंद्र हुडा, श्यामशंकर मिश्रा, मधुसुदन त्रिवेदी, मनोज अवचट, विशाल जयस्वाल, नवीन केवलरमानी व धनराज मेश्राम उपस्थित होते. संचालन व आभार एनआरएचएचे सचिव दीपक खुराणा यांनी मानले.
हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा वापर करावा : देवेंद्र महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:41 PM
हॉटेल व्यावसायिकांनी सोलर ऊर्जेचा मर्यादित वापर करावा आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटी अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे (एनएसएससीडीसीएल) महाव्यवस्थापक (पर्यावरण) देवेंद्र महाजन यांनी येथे केले.
ठळक मुद्दे‘एनआरएचए’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळा होणार