शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

हॉटेल्स पाळत नाहीत ‘बेस्ट बिफोर’चा नियम

By मोरेश्वर मानापुरे | Published: September 07, 2023 7:21 PM

सणासुदीत ग्राहकांना खरेदी करावी लागते शिळी मिठाई

नागपूर : सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये  उत्साह दिसून येत आहे. या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. बहुतांश हॉटेल्स अन्न व औषध प्रशासन विभागाचे ‘बेस्ट बिफोर’चा नियम पाळत नसल्याचे दिसून येते. याकडे विभागाचे दुर्लक्ष असून शिळी मिठाई खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. 

खाद्यतेल, तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घेण्याची जबाबदारी विभागाची कमी तर ग्राहकांची जास्त झाली आहे. सणांच्या काळात ग्राहकांना शुद्ध पदार्थ मिळावे म्हणून अधिकाºयांनी दुकानांच्या तपासण्या आणि अन्न पदार्थांचे नमूने तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी ग्राहक संघटनांकडून होऊ लागली आहे.

‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड पाहिला का? 

हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. अर्थात मिठाईची उत्पादन आणि वापरण्यायोग्य तारीख लिहिणे आवश्यक आहे. पण रक्षाबंधन सणात बहुतांश हॉटेल्समध्ये मिठाईच्या ट्रेवर हा बोर्ड दिसला नाही. याचा अर्थ अनेक हॉटेल्समध्ये तारीख उलटून गेलेल्या मिठाईची विक्री झाली असावी, अशी शक्यता आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई शून्य आहे. 

दुधाची मिठाई २४ तास, तर मोतीचूर लाडू ४८ तास हॉटेल्समधील वेगवेगळ्या मिठाईच्या ट्रेवर वेगवेगळ्या तारखेचे टॅग लावणे बंधनकारक आहे. नियमानुसार हॉटेल मालकाला दुधाची मिठाई २४ तास आणि मोतीचूरचे लाडू ४८ तासांच्या आत विकणे बंधनकारक आहे. खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आतच करावे. तसेच ते साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे. मिठाईची चवीत फरक जाणवल्यास ती नष्ट करावी.

शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये शिळ्या मिठाईची विक्री केल्याची अनेक उदाहरणे आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे प्रत्येक हॉटेल्सची तपासणी करण्यात येत नसल्यामुळे हॉटेल्सचे फावते. पण दुधाचे पदार्थ २४ तासाच्या आत विकावे लागतात. पण अनेक हॉटेल्समध्ये शिळ्या मिठाईची विक्री करण्यात येत असल्यामुळे विषबाधेची शक्यता जास्त असते. 

चार महिन्यांत १२ दुकानांवर कारवायाभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. ते नसल्यास विभाग कारवाई करते. यावर्षी सणांच्या काळात १२ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. 

मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी अर्थात ‘बेस्ट बिफोर’ यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. या संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सणांच्या दिवसात ही मोहीम कठोरपणे राबवू. अभय देशपांडे, उपायुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :nagpurनागपूर