शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

हॉटस्पाॅट परिसर सील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची सर्वात मोठी समस्या असल्याने महापालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची सर्वात मोठी समस्या असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांचा मुक्त संचार असल्याने संक्रमणाचा धोका वाढला आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट भागाला कंटेनमेन्ट झोन घोषित करून हा परिसर सील केला जाणार आहे.

कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी कोरोना चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण व उपचार होणे आवश्यक आहे. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोठी समस्या आहे. बाधिताच्या संपर्कात आलेले अनेक जण कोरोना चाचणी करीत नाही. अशा लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे. असे रुग्ण सर्वत्र वावरत असल्याने संक्रमण वाढत आहे.

महापालिकेच्या लक्ष्मीनगर, हनुमान नगर व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या भागातील हॉटस्पॉट निश्चित करून कंटेनमेन्ट झोन जाहीर करून परिसर सील केला जाणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली. सध्या नागपूर शहरात २७ हजार ८६६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील २३ हजार ८०० होम आयसोलेशनमध्ये तर ३७४१ रुग्णांलयात उपचार घेत आहेत.

...

एका आठवड्यात मृत्यू दुप्पट

१५ ते २१ मार्च २०२० या कालावधीत नागपूर शहरात २२ हजार ५७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर या कालावधीत १६५ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र २१ ते २८ मार्च दरम्यान २५ हजार ७४० पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३०७ रुग्णांचा मृत्यू झाला. आठवडाभरात मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. ही चिंतेची बाब आहे.

...

आधीच्या लाटेच्या तुलनेत परिस्थिती गंभीर

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. १३ सप्टेंबरला बाधितांचा आकडा २३४३ पर्यंत पोहोचला होता. परंतु दुसऱ्या लाटेत हा आकडा कधीच पार केला आहे. १ मार्चपासून बाधितांचा आकडा दररोज वाढत असून तो ३५०० ते ४००० वर गेला आहे. आधीच्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असून चिंता वाढविणारी आहे.

....

१ मार्च ते २८ मार्च दरम्यान झालेली रुग्णवाढ

आठवडा चाचण्या पॉझिटिव्ह मृत्यू

१ ते ७ मार्च ६३८७५ ७१९४ ५५

८ ते १४ मार्च ६८५७२ १२७७३ ६९

१५ ते २१ मार्च १,०२८०४ २२५७८ १६५

२१ ते २८ मार्च १,११,११३ २५७४० ३०७