जीवनावश्यक वस्तू व साहित्याची राखरांगाेळी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भारसिंगी : अचानक घराला आग लागल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू व साहित्याची राखरांगाेळी झाली. ही घटना नरखेड तालुक्यातील राेहणा येथे मंगळवारी (दि. २३) सकाळी ११ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे आगपीडित कुटुंबाचे लाखाेंचे नुकसान झाले.
गाैतम नारनवरे, रा. राेहणा, ता. नरखेड यांचे कुटुंबीय शेतात गेले हाेते. अशातच सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. काही क्षणात आगीने राैद्ररूप घेतल्याने आजुबाजूच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे काटाेल नगरपरिषदेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र ताेपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू, कपडे व इतर घरगुती साहित्य खाक झाले हाेते. यात नारनवरे कुटुंबाचे अंदाजे एक लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
घराला आग लागल्याची माहिती मिळताच नारनवरे कुटुंबीय शेतातून घरी आले. घराला आग नेमकी कशामुळे लागली, हे कळू शकले नाही.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच पं. स. सभापती नीलिमा रेवतकर, प्रवीण मधाेरिया, संजय बडाेदेकर, राजेंद्र दहाट, सुनील नारनवरे, हेमराज चाैधरी आदींनी राेहणा येथे भेट देऊन नारनवरे कुटुंबियांचे सांत्वन केले. आगपीडित कुटुंबास शासनाकडून तातडीने मदत देण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.