खापरखेडा : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा एकूण ३ लाख ९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेडा येथे घडली. गुरुवारी (दि. १५) सायंकाळी ही घटना उघडकीस आली.
अर्जुन भुवनेश्वर साव (६५, रा. अण्णामाेड, खापरखेडा, ता. सावनेर) हे त्यांच्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने २ लाख ५७ हजार ७०० रुपये किमतीचे साेन्याचे दागिने, ३६ हजार ९०० रुपयांचे चांदीचे दागिने व १५ हजार रुपये राेख असा एकूण ३ लाख ९ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच अर्जुन साव यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक मनाेज मेश्राम करीत आहेत.